घरमहाराष्ट्रव्याजदर वाढूनही मुंबईत घरविक्री तेजीत

व्याजदर वाढूनही मुंबईत घरविक्री तेजीत

Subscribe

- जानेवारी ते मार्च पहिल्या तिमाहीत ३९ टक्के वाढ, तर देशभरातील घरांच्या विक्रीत २२ टक्क्यांची वाढ

गृहकर्जांवरील व्याजदरांमध्ये वाढ होऊनदेखील नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च २०२३) मुंबईतील घरांच्या विक्रीत ३९ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातील मुंबई, पुणे, दिल्ली-एनसीआर, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू या ८ प्रमुख शहरांतील निवासी बाजारपेठांनी या कालावधीदरम्यान चांगली कामगिरी केली आहे.

प्रॉपटायगर डॉटकॉमच्या ‘रिअल इनसाईट रेसिडेन्शियल जानेवारी-मार्च २०२३’च्या अहवालानुसार घरांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी विकासकांनी मालमत्ता बाजारपेठेत नवीन प्रकल्प सादर केले. या ८ शहरांमध्ये २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ७०,६३० घरांची विक्री झाली होती. ही विक्री चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाढून ८५,८५० घरांपर्यंत गेली आहे. या ८ प्रमुख शहरांमधील नवीन प्रकल्पांसह घरांची संख्या ७९,५३० वरून ८६ टक्क्यांच्या वाढीसह १,४७,७८० पर्यंत वाढली आहे, जी तिमाहीत सर्वाधिक आहे.घरांच्या विक्रीत हैदराबाद अव्वल स्थानी असून येथे घरांच्या विक्रीत ५५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

- Advertisement -

यापाठोपाठ मुंबई, अहमदाबाद, पुणे आणि चन्नईचा क्रमांक लागतो. तेथे अनुक्रमे ३९ टक्के, ३१ टक्के, १६ टक्के आणि १० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, तर बंगळुरू, कोलकाता, दिल्ली येथील घरांच्या विक्रीत अनुक्रमे ३ टक्के, २२ टक्के आणि २४ टक्क्यांची घट झाली आहे.

महाराष्ट्रातील दोन प्रमुख बाजारपेठा मुंबई व पुणे येथे विक्रीत अनुक्रमे ३९ टक्के आणि १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये निवासी मालमत्तांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमधील २३,३७० घरांच्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या तिमाहीत ३२,३८० घरांपर्यंत वाढ झाली. पुण्यामध्ये घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमधील १६,३२० घरांवरून कॅलेंडर वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत १८,९२० घरांपर्यंत वाढ झाली.

- Advertisement -

नवीन पुरवठ्यात मुंबई अव्वल
नवीन घरांच्या पुरवठ्यात मुंबई अव्वल राहिली आहे. पहिल्या तिमाहीत मुंबईचा ४१ टक्क्यांचा मोठा वाटा होता. २०२३ च्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक नवी घरे ही ४५ लाख ते ७५ लाख रुपयांच्या श्रेणीमधील होती. एकूण घरांमध्ये या घरांचा ३२ टक्के वाटा होता. १ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या श्रेणीमधील घरांचादेखील २९ टक्क्यांचा मोठा वाटा होता.

देशांतर्गत बाजारपेठेत गृहकर्जावरील व्याजदरात वाढ होऊनदेखील घरांची झालेली विक्री लक्षणीय म्हणावी लागेल. कुठल्याही अडथळ्यांना न जुमानता देशातील घरखरेदी २२ टक्क्यांनी वाढली हे उत्साहवर्धक आहे. यातून घरविक्रीला सतत गती मिळत असल्याचे दिसत आहे.
-विकास वाधवान, मुख्य वित्तीय अधिकारी, प्रॉपटायगर डॉटकॉम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -