घरमहाराष्ट्रठरलं, उद्या लागणार बारावीचा निकाल

ठरलं, उद्या लागणार बारावीचा निकाल

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या राज्य शिक्षण मंडळाचा बारावी म्हणजेच एच.एस.सी. बोर्डाचा निकाल मंगळवारी २८ मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल जाहीर होणार असून त्याची अधिकृत घोषणा राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे. राज्य शिक्षण मंडळांकडून निकालाची अधिकृत घोषणा ११ वाजता करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल १ वाजता पहायला मिळणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

कुठे पहाल निकाल

www.maharesult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeduction.com
www.mahrashtra12.jagranjosh.com

- Advertisement -

मोबाईलवर कसा पहाल निकाल

BSNL ग्राहकांना मोबाईलवरुन निकाल पाहता येणार असून त्यासाठी MHHS <Space> <Seat No.> टाईप करुन तो ५७७६६ या क्रमाकांवर पाठविल्यास विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -