घरमहाराष्ट्रJob Employment : ऑक्टोबर मध्ये १९,६४८ बेरोजगारांना रोजगार; मंत्री नवाब मलिक यांची...

Job Employment : ऑक्टोबर मध्ये १९,६४८ बेरोजगारांना रोजगार; मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Subscribe

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये १९ हजार ६४८ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी दिली.

महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तर चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबरअखेर १ लाख ४७ हजार ८८१ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते, अशी माहिती मलिक यांनी दिली.

विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९१ हजार ९०८ इतक्या सार्वजनिक आणि खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरी इच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -