घरमहाराष्ट्रVIDEO: नाशिकमध्ये बिबट्याचा थरार; ७ तासानंतर बिबट्या जेरबंद

VIDEO: नाशिकमध्ये बिबट्याचा थरार; ७ तासानंतर बिबट्या जेरबंद

Subscribe

नाशिकच्या गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरात पुन्हा बिबट्याचा संचार झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे.

नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली होती. नाशिकच्या गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरात बिबट्या शिरला होता. रविवारी सकाळच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्या दिसून आल्यामुळे सावरकरनगरमधील नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. ७ तासांच्या परिश्रमानंतर अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात विनविभागाला यश आले आहे. दरम्यान, या बिबट्याने एका वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वनविभागाचा कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

नाशिक – गंगापूर रोडवरील सावरकर नगर आज पुन्हा एकदा बिबट्याचा संचार

नाशिक – गंगापूर रोडवरील सावरकर नगर आज पुन्हा एकदा बिबट्याचा संचार | #MyMahanagar

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, 16 February 2019

- Advertisement -

बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरु

नवरचना शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ग्रीन फार्मसीसमोर असलेल्या एका पडीक बंगल्यात हा बिबट्या लपलेला होता. सकाळपासूनच वनविभागाचे या ठिकाणाकडे तळ ठोकला होता. या ठिकाणी बिबट्या लपून बसला असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला पकडण्याच्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र बिबट्याने वनविभागाचे परिमंडळ अधिकारी रवी सोनार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. हा रस्ता वर्दळीचा आणि दाट लोकवस्तीचा असल्याने वनविभागाने सावधपणे ही मोहीम हाती घेतली आणि अखेर बिबट्याला जेरबंद केले.

बिबट्याने केला होता ४ जणांवर हल्ला

नाशिकमध्ये २५ जानेवारीला सावरकरनगरमध्ये बिबट्या शिरला होता. नाशिकच्या गंगापूर रोडवरील सावरकरनगर भागातील शंकरनगरमध्ये बिबट्या शिरला. या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ४ जण जखमी झाले आहेत. या बिबट्याने नगरसेवक संतोष गायकवाड यांच्यासह ३ जणांवर हल्ला केला. ३ तासाच्या अथक प्रयत्नांननंतर वन विभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. त्याच भागामध्ये आता पुन्हा बिबट्याचा वावर झाल्यामुळे नागरिक पुन्हा घाबरले आहेत. वनविभाग बिबट्याचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -