घरमहाराष्ट्रमाधुरी दीक्षित मतदारांना करणार मतदानासाठी आवाहन

माधुरी दीक्षित मतदारांना करणार मतदानासाठी आवाहन

Subscribe

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आता मतदारांना मदतानासाठी आवाहन करणार आहेत. मुख्य निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणुकीपूर्वी सेलिब्रिटींच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती केली जाते. यंदा अभिनेत्री माधुरी दीक्षित या उपक्रमात सहभागी होत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त, भारत निवडणूक आयोग यांच्या हस्ते विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन आज, बुधवारी सायंकाळी ५.५५ ते ६.१५ वाजेपर्यंत सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे होणार आहे.

या कार्यक्रमांचे नियोजन –

1. मतदार जागृती वाहनाला झेंडे दाखवून उद्घाटन

- Advertisement -

2. ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

3. पोस्ट तिकिट आणि टपाल कव्हरचे प्रकाशन

- Advertisement -

4. कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

5. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे लिखित पुस्तकाचे प्रकाशन

6. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित अभिनित मतदार जागृती चित्रफीतीचे उद्घाटन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -