घरमहाराष्ट्रजालना - औरंगाबाद मार्गावर मालगाडीची २० मजूरांना धडक; १५ जणांचा मृत्यू

जालना – औरंगाबाद मार्गावर मालगाडीची २० मजूरांना धडक; १५ जणांचा मृत्यू

Subscribe

जालना – औरंगाबाद मार्गावर करमाजवळ रेल्वे रुळावरून जाताना मालगाडीने २० मजूरांना उडवले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. जालन्याहून भुसावळला पहाटे ४ वाजता जाणाऱ्या मालगाडीला हा अपघात घडला. या दुर्घटनेत १५ मजूरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १ जण गंभीर जखमी असून ४ मजूर या घटनेतून बचावले आहेत. गावी परतत असताना थकून रेल्वे रुळावर झोपले असताना मालगाडी आल्याने ही मजूरांवर हा प्रसंग ओढावल्याचे समजते. दुर्घटनेतील सर्व हे जालन्यातील खासगी कंपनीतील मजूर असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

काय आहे घटना 

याबाबत जालन्यातील पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालन्याहून भुसावळला निघालेल्या २० मजूरांसोबत ही दुर्दैवी घटना घडली. हे सर्व मजूर रेल्वे रुळाच्या बाजूने पटरीवरून पायी चालत जात होते. रात्रीच्या वेळी थकून काही मजूर या रुळावर झोपले. दरम्यान, पहाटे जालना ते औरंगाबादला जाणाऱ्या मालगाडीला अपघात होऊन हे मृत्यूमुखी पडले. हे सर्व जालन्यातील एमआयडीसीमधील मजूर असल्याचे सांगितले जात आहे. मूळचे मध्य प्रदेशातील हे मजूर भुसावळला जाऊन रेल्वे पकडणार होते, असेही समजते. या घटनेची माहिती जालन्यातील एमआयडीसीला देण्यात आली असून रेल्वे प्रशासनालाही याबाबत अवगत करण्यात आले असल्याचे पोलीस अधिक्षक म्हणाले. तसेच पोलीस प्रशासन या घटनेबाबत पंचनामा आणि अधिक तपास करत आहे.


अपघाताच्या चौकशीचे रेल्वे मंत्रालयाचे आदेश 

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून केंद्रीय मंत्रालयानेही याबाबत रेल्वे प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या घटनेवर दुःख व्यक्त केले आहेत. तसेच आपण रेल्वे मंत्री पियुल गोयल यांच्याशी संवाद साधला असून त्यांना या घटनेवर लक्ष घालण्यास सांगितले असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. शिवाय यासंदर्भात आवश्यक ती सर्व मदत मिळावी, याचीही काळजी घेण्यास सांगितल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -


मध्य प्रदेश सरकारची ५ लाखांची मदत जाहीर 

दुर्घटनेतील सर्व मजूर मध्य प्रदेशमधील असून येथील सरकारने मृत मजुरांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचाराची जबाबदारी घेतली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मदत जाहीर केली. तसेच या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

हेही वाचा –

कोरोनावर आयुर्वेद उपचाराला मंजुरी नाही; आयुष संचालनालयाचा प्रस्ताव वेटिंगवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -