घरमहाराष्ट्रकुटुंबीयांना संवेदनशील भागात आणू नये : MNPF

कुटुंबीयांना संवेदनशील भागात आणू नये : MNPF

Subscribe

सरकार या संघटनेवर कधी आणि काय कारवाई करते याकडे सर्वांचे लागले लक्ष

मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जणांनी आपला जीव गमावला. एक कर्नल तसेच चार जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. तर कर्नलच्या परिवारातल्या दोन सदस्यांचाही या हल्ल्यात जीव गेला आहे. या हल्ल्याची जबाबदारी मणिपूर नागा पीपल्स फ्रंटने (MNPF) घेतली आहे.

जवानांनी आपल्या कुटुंबीयांना अशा संवेदनशील भागांमध्ये आणू नये असा सल्ला MNPFने जारी केलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. ज्या परिसराला सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील घोषित केले आहे, त्या भागांमध्ये परिवारांनी वावरणे योग्य नाही. हे संयुक्त निवेदन MNPF चे उपप्रचार सचिव रोबेन खुमान आणि थॉमस नुमाई यांनी दिले आहे. त्यांनी या हल्ल्याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. आता सरकार या संघटनेवर कधी आणि काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -