घरमहाराष्ट्रMonsoon 2024 : यंदा पाऊस 100 टक्के पार; IMD ने वर्तविला अंदाज

Monsoon 2024 : यंदा पाऊस 100 टक्के पार; IMD ने वर्तविला अंदाज

Subscribe

यावर्षी देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव कमी होणार असल्यामुळे त्याचा मान्सूनवर परिणाम दिसणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

मुंबई : दरवर्षी सगळे शेतकरी हवामान विभागाचा नेमका काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे. भारतातील मान्सून यंदा सामान्यपेक्षा चांगला राहणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यावर्षी देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव कमी होणार असल्यामुळे त्याचा मान्सूनवर परिणाम दिसणार आहे, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान खात्याने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. (Monsoon 2024 100 percent rainfall this year IMD predicts)

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, एल निनोच्या घटत्या प्रभावामुळे ला निनाचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होऊ शकते. मान्सूनच्या पावसाच्या दीर्घकालीन अंदाजावर पत्रकार परिषदेला संबोधित करताना, भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले की, 1971 ते 2020 पर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीवर आधारित दीर्घकालीन अंदाज जारी करण्यात आला आहे. ते म्हणाले की 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत देशभरात सरासरी 106 सेमी पाऊस पडू शकतो. तर यंदा 8 जूनपर्यंत मान्सून देशात येण्याची स्थिती आहे.

- Advertisement -

अल निनोमुळे मान्सूनच्या पावसात वाढ (Increase in monsoon rains due to El Nino)

भारतीय हवामान खात्याने म्हटले की, सन 1951 ते 2023 पर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असे आढळून आले आहे की, देशात आतापर्यंत 9 वेळा मान्सून सामान्यपेक्षा चांगला झाला आहे. विषुववृत्ताजवळ प्रशांत महासागरात असलेला अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या पावसात वाढ झाली आहे. एम रविचंद्रन म्हणाले की, 1971 ते 2020 पर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीनुसार, आम्ही नवीन दीर्घकालीन सरासरी आणि सामान्य सादर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -