घरमहाराष्ट्रमहावितरणच्या लाचखोर अधिकाऱ्यांची नाक घासत कबुली

महावितरणच्या लाचखोर अधिकाऱ्यांची नाक घासत कबुली

Subscribe

वीज बिल भरा अन्यथा वीज तोडू अशा धमका देत बोगस वाढीव बील दाखवत ग्राहकांकडून पैसे उकळणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी वीज वितरण कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना भाजपने दणका दिला. यामुळे जमिनीवर नाक घासत, हाता पाया पडत या लाचखोर अधिकाऱ्यांनी ग्राहकांची माफी मागितली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.लॉकडाऊनच्या काळात शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत अनेकांना अव्वाच्या सव्वा बीज बिल आली आहेत. आधीच लॉकडाऊन व कोरोनामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी याच परिस्थितीचा गैरफायदा घेत ग्राहकांकडून पैसे उकळणे सुरू केले. वीज बिल भऱा नाहीतर वीज तोडू , नाहीतर सवलत हवी असेल तर पैसे द्या अशा धमक्या हे अधिकारी ग्राहकांना देत आहेत. यामुळे गावकऱ्यांनी येथील भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी यांच्याकडे या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबदद्ल तक्रारी केल्या. त्यानंतर काझी यांनी संबंधित दोन अधिकाऱ्यांच्या विरोधातील पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर केले. आपले पितळं उघडे पडल्याचे बघून दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्यावरील आरोपांची कबुली दिली. त्यानंतर एका अधिकाऱ्याने जमिनीवर नाक घासत गावकऱ्यांची जाहीर माफी मागितली.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -