घरCORONA UPDATECoronaVirus: ...आणि महापौरांनी केले स्वत:ला क्वारंटाईन!

CoronaVirus: …आणि महापौरांनी केले स्वत:ला क्वारंटाईन!

Subscribe

काही पत्रकारांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे अखेर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महापौर किशोरी पेडणेकर यांनी यापुढे घरी राहण्याचा निर्णय घेत स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर आणि आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले हे सर्व रुग्णालय तसेच महापालिकेच्या कार्यालयांमध्ये भेटी देवून नगरसेवकांसह अधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेत आहेत. परंतु दोन दिवसांपूर्वी पत्रकारांची कोरोना चाचणी शिबिरातही त्या सहभागी होवून त्यांनी स्वत:चीही चाचणी केली होती. परंतु त्यांच्या संपर्कातील काही पत्रकारांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे अखेर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांनी यापुढे घरी राहण्याचा निर्णय घेत स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले आहे.

काय म्हणाल्या महापौर 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका व्हिडिओमार्फत आपण स्वत:ला क्वारंटाईन करून घेत असल्याचे म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या सहकार्याने दोन दिवसांपूर्वी पत्रकारांची कोविड १९ ची चाचणी केली होती. यामध्ये १६७ पत्रकारांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये खुद्द महापौर किशोरी पेडणेकर आणि अमेय घोले यांनीही चाचणी करून घेतली होती. परंतु या दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी एकूण ५३ पत्रकारांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आयोजित शिबिरात महापौर ज्या काही पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या, त्यातील पाच ते सहा पत्रकारांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे मंगळवारी दुपारी त्यांनी स्वत:ला घरीच क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवा नेते मंत्री आदित्य ठाकरे यांनी सातत्याने स्वत:ची काळजी घ्या. खबरदारी घ्या, असे सांगत आले आहे. परंतु पत्रकारांच्या शिबिरात मी स्वत: सहभागी झाले होते. त्यातील काही पत्रकारांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. माझा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी काळजीपोटी मी स्वत: थांबण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यापुढे १४ दिवस मी व माझा स्टाफ क्वारंटाईनमध्ये घरीच राहणार आहे. इथूनच काम करणार आहे. पुढे पाच दिवसांनी सर्वांची चाचणीही करून घेवू. कोणीही काळजी करून नये. आम्ही खबरदारीचा भाग म्हणून घरीच क्वारंटाईन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबई महापौर किशोरी पेडणेकरही झाल्या क्वारंटाइन | Mumbai Mayor kishori pednekar home quarantine

मुंबई महापौर किशोरी पेडणेकरही झाल्या क्वारंटाइन | Mumbai Mayor kishori pednekar home quarantine

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 20, 2020

महापौरांनी हा निर्णय घेण्यापूर्वी अमेय घोले यांच्यासह के-पूर्व विभागातील नगरसेवकांची बैठक घेवून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच यापूर्वी त्यांनी विविध रुग्णालयांसह महापालिका विभाग कार्यालयांमधील नगरसेवकांची बैठक घेवून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तसेच काही दिवसांपूर्वी महापौरांनी महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षात बैठक घेतली. त्याच कक्षात दोन संशयित रुग्ण आढळून आले आल्याने महापौरांना स्वत: क्वारंटाईन करून घ्यावे लागल्याचेही बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

महापालिका मुख्यालयातील वॉर रुमला ‘कोरोना’ विषाणूची ठकठक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -