मुंबई- पुणे एक्स्प्रेस आज दोन तासासाठी बंद राहणार आहे. गुरुवारी म्हणजेच ६ सप्टेंबरला १२ ते २ असा दोन तास एक्स्प्रेस वे बंद राहणार आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर वळवण्यात येणार आहे. एमएसआरडीसीने ही माहिती दिली आहे.
खालापूर टोलनाक्याच्या आधी ओव्हरहेड गेन्ट्री बसविण्यात येणार आहे. त्यासाठी एक्स्प्रेस वेचे दोन्ही मार्ग दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये तसंच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शेंगुड फाटा येथून जुन्या मुंबई -पुणे महामार्गावर वाहतूक वळवण्यात येणार आहे.