घरमहाराष्ट्रनारायण राणे महाड पोलिसांच्या ताब्यात; न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणार

नारायण राणे महाड पोलिसांच्या ताब्यात; न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणार

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी संध्याकाळी नारायण राणे यांना महाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून नारायण राणेंना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. राणेंना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार असल्याचे सांगितले जात असून सध्या नारायण राणे हे महाड पोलिसांच्या ताब्यात आहेत.

दरम्यान, नाशिक आणि पुणे पोलीसांच्या टीमही महाडमध्ये पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली असून कोकण आय जी संजय मोहिते, पोलीस अधीक्षक अशोक दुधे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये हजर आहेत. आजच राणेंना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे. १ एसआरपी कंपनी , ४ डीवायएसपी, २० पोलीस निरीक्षक, धडक कृती दल असा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नारायण राणे महाड पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर महाड MIDC पोलीस ठाण्याला येणाऱ्या राणे समर्थकांनी गर्दी देखील केली होती. तर नारायण राणे समर्थकांचा पोलीस स्टेशनबाहेर गोंधळ करत महाड MIDC पोलीस ठाण्याला येणाऱ्या राणे समर्थकांच्या गाडीवर दगडफेक देखील केली.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याचे आक्षेपार्ह वक्तव्य राणेंनी केले होते. त्याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राणेंना अटक करण्यात आली. नारायणे राणे हे जन आशीर्वाद यात्रेत असताना त्यांना संगमेश्वर पोलिस ठाण्यातील गोळवली हद्दीत १४.२५ वाजताच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. तसेच पुढील कारवाईसाठी रायगड पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. रायगडचे अप्पर पोलिस अधिक्षक सचिन जौंजाळ यांच्या टीमने नारायण राणेंना ताब्यात घेतले आहे. अटकेवेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी आधी कार्यकर्त्यांना पांगवलं आणि नंतर राणेंना बाहेर काढलं. भाजप कार्यकर्त्यांनी राणेंची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला.

असे आहे प्रकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. १५ ऑगस्टला ठाकरे यांनी देशाच्या स्वांतत्र्यदिनावरून भाष्य केले होते. त्यावरूनच राणे यांनी ठाकरे यांना लक्ष्य केलं. ठाकरेंना स्वातंत्र्यदिनाला किती वर्ष झाले हे माहित नाही. म्हणून भाषणावेळी ते सतत मागे बघून कोणाला तरी विचारत होते. मुख्यमंत्र्याचे हे वागणे बरोबर नाही मी जर तिथे असतो तर त्यांच्या कानाखाली मारलं असते. असे खळबळजनक विधान राणे यांनी केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून आज मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी येथे शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -