घरमहाराष्ट्र'आयुष्मान भारत' योजनेमुळे ८३ लाख कुटुंबांना मोफत उपचार

‘आयुष्मान भारत’ योजनेमुळे ८३ लाख कुटुंबांना मोफत उपचार

Subscribe

केंद्र शासनाची महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’ चा देशासह महाराष्ट्रात सोमवार, २३ सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे. या योजनेमुळे राज्यातील ८३.७२ लाख कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे.

केंद्र शासनाची महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’ चा देशासह महाराष्ट्रात सोमवार, २३ सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे. या योजनेमुळे राज्यातील ८३.७२ लाख कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. आयुष्यमान भारत योजनेसोबतच राज्य शासनाची ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ ही एकत्रितपणे राबवण्यात येणार आहे, असं आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.

दरवर्षी पाच लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत

२०११ मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार ८३.७२ लाख कुटुंबांची निवड आयुष्मान योजनेंतर्गत करण्यात आली असून त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. या योजनेत शासकीय रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा देण्यात येणार आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करुन घेतले जाणार आहे.

- Advertisement -

योजनेंतर्गत १९ लाख शस्त्रक्रिया केल्या

राज्यात सध्या पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारकांसाठी ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ राबवली जात असून त्याचा लाभ २ कोटी २३ लाख कुटुंबांना देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून ९७१ प्रकारचे उपचार, १२१ शस्त्रक्रियेनंतरच्या सेवा देण्यात येत असून प्रतीवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत उपचारांची सुविधा योजनेतून दिली जात आहे. राज्यातील ४८४ शासकीय आणि खासगी रुग्णालयांमार्फत ही सेवा दिली जात आहे. तसेच, आतापर्यंत १९ लाखांहून अधिक शस्त्रक्रिया योजनेंतर्गत केल्या गेल्या आहेत.

शुभारंभाल ई-कार्डचेही वाटप होणार

राज्यात आयुष्मान भारत योजनेसोबतच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रितरित्या राबवली जाणार आहे. २३ सप्टेंबर २०१८ ला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. यावेळी निवडक लाभार्थ्यांना ई-कार्ड चे वाटप केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -