घरमहाराष्ट्रपुण्यात लॉकडाऊन? 'या' तारखेला कठोर निर्णय घेणार; अजित पवारांची माहिती

पुण्यात लॉकडाऊन? ‘या’ तारखेला कठोर निर्णय घेणार; अजित पवारांची माहिती

Subscribe

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील लॉकडाऊनबाबत महत्त्वाची माहिती दिली. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. नाईलाजास्तव कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर २ एप्रिलपर्यंत कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. सर्व नागरिकांनी कोरोना बाबतचे सर्व नियमांचं पालन करावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. पुण्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी, महापौर, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

पुण्यात सध्या लॉकडाऊन करण्यात येणार नाही,असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पुणे शहरात १ ते १४ एप्रिल या कालावधीत लॉकडाउन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून देण्यात आला. या प्रस्तावावर अजित पवार यांच्या उपस्थितीत कौन्सिल हॉल येथे आयोजित बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लॉकडाउन करण्यास विरोध केला. यावर जिल्ह्याधिकारी राजेश देशमुख यांनी आता लॉकडाऊन जाहीर करण्याऐवजी १ एप्रिलला पुन्हा बैठक घेऊन आढावा घ्यावा, अशी सूचना केली. अखेर चर्चेअंती अजित पवार यांनी सध्या लॉकडाऊन न घेण्याचा निर्णय जाहीर केला.

- Advertisement -

खासगी रुग्णालयातील ५० टक्के खाटा ताब्यात घेतले जाणार आहेत. तसंच लसीकरणाची केंद्र दुप्पट केली जाणार आहेत. लसीकरण केंद्रांची संख्या ३०० वरुन ६०० करणार, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. यासह खासगी, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं. तसंच राजकीय नेत्यांनी देखील बैठका घेऊ नका असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -