घरमहाराष्ट्रराहुल गांधींच्या रविवारी चंद्रपूर, लातूर, धारावीत सभा

राहुल गांधींच्या रविवारी चंद्रपूर, लातूर, धारावीत सभा

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी प्रचार करणार की नाहीत, हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता. मात्र राहुल गांधी हे निवडणूक प्रचाराला महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांची पहिली सभा १३ ऑक्टोबर रोजी सकाळी चंद्रपूर येथे होणार आहे. त्यानंतर दुपारी लातूरला तर संध्याकाळी धारावीतदेखील राहुल गांधी यांची सभा होणार आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा महाराष्ट्र निवडणूक प्रचारदौरा जाहीर करण्यात आला. यावेळी एकनाथ गायकवाड यांच्यासोबत उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे महासचिव संदेश कोंडविलकर, तसेच जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे उपस्थित होते. काँग्रेसतर्फे जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबर रोजी राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येणार आहेत.

- Advertisement -

राहुल गांधी सकाळी चंद्रपुरात पहिली सभा घेण्यात येणार असून त्यानंतर ते दुपारी लातूर येथे सभा घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर संध्याकाळी ते मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत संध्याकाळी धारावी येथे सभा घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -