घरगणपती उत्सव बातम्या'गणपतीक' गावाक जाताय? मग तुमच्यासाठी खुशखबर

‘गणपतीक’ गावाक जाताय? मग तुमच्यासाठी खुशखबर

Subscribe

१२ सप्टेंबरपासून या गणपती विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. पश्चिम उपनगरात राहणाऱ्या चाकरमान्यांना या गाड्यांचा नक्कीच फायदा होईल.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी कोकणात जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. प्रतिवर्षी हजारो लोक गणेशोत्सवासाठी मुंबईहून आपल्या गावी ट्रेनने प्रवास करतात. त्यामुळे बऱ्याच जणांना ट्रेनमध्ये आरक्षित जागा मिळणं कठीण होतं. अनेक महिने आधीपासून आरक्षणाच्या प्रयत्नात असलेल्यांना बरेचदा आरक्षण मिळत नाही. यामुळे गणेशोत्सवासाठी गावाला जाऊ न शकलेले चाकरमानी साहजिकच नाराज होतात. मात्र या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एक खुशखबर दिली आहे. यंदा गणपतीसाठी कोकण रेल्वेच्या स्पेशल ट्रेन्स सोडण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवरून या जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या  मुंबई सेंट्रल-वांद्रे टर्मिनस-अहमदाबाद आणि थिविम-मडगाव जंक्शन – मंगळुरू जंक्शन या मार्गांवर चालवल्या जाणार आहेत.

  • ०९००१ मुंबई सेंट्रल – मंगळुरू – मुंबई सेंट्रल (साप्ताहिक) ही गाडी, १२ ते १९ सप्टेंबरदरम्यान मुंबई सेंट्रलहून बुधवारी ११.५० वाजता  सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता पोहचेल. 
  • ०९००२  ही परतीची गाडी मंगळुरूहून १३ ते २० सप्टेंबर कालावधीत गुरुवारी रात्री. ११.१० वाजता सुटेल. ही गाडी मुंबई सेंट्रलला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता पोहचेल. 
  • थांबा –  बोरिवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मडुरे, थिविम, मडगाव ते सूरतकल स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. 
  • ०९००९  वांद्रे टर्मिनस – मंगळुरू ही गाडी ११ ते १८ सप्टेंबर या दरम्यान वांद्रे टर्मिनसहून मंगळवारी रात्री .११.५५ वाजता सुटून ही गाडी मंगळुरूला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.३० वा. पोहचेल. 
  • ०९०१० ही परतीची गाडी १२ ते १९ सप्टेंबरदरम्यान बुधवारी मंगळुरूहून रात्री ११.१० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी वांद्रे टर्मिनसला सायं. ६.४५ वाजता पोहचेल. 
  • ०९०११ ही वांद्रे – मंगळुरू एसी विशेष गाडी १६ ते २३ सप्टेंबरदरम्यान प्रत्येक रविवारी ९, १६, २३ सप्टेंबर रोजी वांद्रे टर्मिनसहून रात्री ११.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी मंगळुरू येथून संध्याकाळी ७.३० वाजता पोहचेल. 
  • ०९०१२ ही गाडी  मंगळुरू – वांद्रे टर्मिनस एसी गाडी १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान दर सोमवारी १०, १७, २४ सप्टेंबर रोजी मंगळुरूहून रा. ११.१० वाजता गाडी सुटून दुसऱ्या दिवशी वांद्रे टर्मिनस येथे सायंकाळी ६.४५ वाजता पोहचेल. 
  • ०९००७ ही गाडी मुंबई सेंट्रल – थिविम – मुंबई सेंट्रल विशेष गाडी आठवड्यातून तीन वेळा चालवली जाणार आहे. मुंबई सेंट्रलहून ही गाडी ६, ८, १०, १३, १५, १७, २०, २२ सप्टेंबर रोजी रात्री ११.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी थिविम येथे दु. ४ वाजता पोहचेल. 
  • ०९००८ ही परतीची गाडी थिविमहून ७, ९, ११, १४, १६, १८, २१, २३ सप्टेंबर रोजी दु. ४.३० वाजता सुटून मुंबई सेंट्रलला  सकाळी ९.०५ वा. पोहचेल. 
  • थांबा : बोरिवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मडुरे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -