घरमहाराष्ट्रतपास यंत्रणांच्या छाप्यांमुळे अजित पवारांना फारसा फरक पडणार नाही - रामदास आठवले

तपास यंत्रणांच्या छाप्यांमुळे अजित पवारांना फारसा फरक पडणार नाही – रामदास आठवले

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार, तीन बहिणी आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने छापे मारले. आयकर विभागाच्या या धाडसत्रावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तपास यंत्रणांच्या छाप्यांमुळे अजित पवारांना फारसा फरक पडणार नाही, असं रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये एका कार्यलयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर काही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्या तरी अजित पवार यांच्या कुटुंबियांवर पडलेल्या छापेमारीमध्ये केंद्र सरकारचा किंवा भाजपचा कसलाही हस्तक्षेप नाही. या यंत्रणा स्वतंत्र आहेत. ज्या ज्या ठिकाणी अनियमितता आढळते, त्या ठिकाणी चौकशी होती. त्यामुळे काही कमी जास्त असेल, चौकशी झाली तर अजित पवार यांना फारसा फरक पडणार नाही, असं म्हणत या कारवाया केंद्र सरकारच्या सांगण्यावरुन होत असल्याचा आरोप चुकीचा आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

- Advertisement -

अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी ४-५ दिवस होते. यावर प्रतिक्रिया देताना यंत्रणा त्यांच्या कार्यपद्धतीनुसार काम करत आहेत. याआधी देखील अशा कारवाया झाल्या आहेत, असं रामदास आठवले म्हणाले.

नवाब मलिक यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही आहे. एनसीबीने सुशांतसिंग प्रकरणात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करांना पकडण्यात आलं. नवाब मलिक यांनी जो आरोप केला आहे, मुद्दाम आर्यन खानला पकडण्यात आलं. तर तंस काही नाही. एनसीबीला माहिती मिळाली असेल त्यानुसार त्यांनी ती कारवाई केली, असं रामदास आठवले म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -