घरमहाराष्ट्रSharad Pawar : 'त्या' आता चिमण्या राहिल्या नाहीत; शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

Sharad Pawar : ‘त्या’ आता चिमण्या राहिल्या नाहीत; शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

Subscribe

 

नाशिकः जे गेले आहेत ‘त्या’ आता चिमण्या राहिल्या नाहीत, अशी मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी शनिवारी केली. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब या चिमण्यांनो परत फिरा रे, असं बोलले होत. मग तुम्ही आता पक्ष सोडून गेलेल्यांना असंच परत बोलावणार का?, या प्रश्नाचे उत्तर देताना शरद पवार यांनी ही टिप्पणी केली.

- Advertisement -

येवला येथे शरद पवार यांची आज जाहीर सभा आहे. त्या आधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी येथे टीका करायला आलो नाही. लोकांना सत्य सांगायला आलो आहे. जे घडलं आहे ते सांगायला आलो आहे. जे सोडून गेले आहेत, ही त्यांची भूमिका आहे. त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. पण लोकांना सत्य कळायला हवं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

नाशिक येथून सभेची सुरुवात केली कारण नाशिकला स्वातंत्र्यवीरांचा वारसा आहे. नाशिककरांनी वेळोवेळी राष्ट्रवादीला साथ दिली आहे. नाशिकमधील कितीजण माझ्यासोबत आहेत हे मला माहीत नाही. पण लोकांना वस्तूस्थिती कळायला हवी यासाठी मी नाशिकमध्ये आलो आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

चर्चा म्हणजे निर्णय नसतो

भाजपसोबत जाण्यासोबतचा निर्णय सन 2014, 2017 आणि 2019 मध्ये झाला होता. शेवटच्या क्षणाला शरद पवार यांनी माघार घेतली, असा आरोप अजित पवार यांनी केला. त्यावर शरद पवार म्हणाले, भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरु होत्या. चर्चा होतच असतात. पण चर्चा करणे म्हणजे निर्णय होणे असा त्याचा अर्थ होत नाही. सर्वांशी बोलूनच मी प्रत्येकवेळी निर्णय घेतला. शेवटी सामूहिक मत महत्त्वाचं असतं, असे शरद पवार यांनी सांगितले.

राजकारणा मी कोणाला शत्रू मानत नाही

राजकारणात मी कोणाला शत्रू मानत नाही. वैचारीक मतभेद असू शकतात. पण कोणी कायमचा शत्रू कोणचं नसतो, असे शरद पवार यांनी सांगितले. आता कोण मोठा शत्रू आहे अजित पवार की भाजप या प्रश्नावर शरद पवार यांनी हे उत्तर दिले.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -