घरमहाराष्ट्रकन्नड सिनेमाचे शो शिवसैनिकांनी पाडले बंद

कन्नड सिनेमाचे शो शिवसैनिकांनी पाडले बंद

Subscribe

भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सीमावाद पुन्हा एकदा पेटला असून या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील एका थिएटरमधील कन्नड सिनेमाचे शो देखील बंद पाडले आहेत.

‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या नेत्यांबद्दल कर्नाटक नवनिर्माण सेनेचे नेते भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सीमावाद पुन्हा एकदा पेटला. या वादाचे पडसाद सांगली, कोल्हापूरमध्ये देखील पाहायला मिळाले. तसेच या पार्श्वभूमीवर सीमावासियांवरी अन्याच्या विरोधात शिवसेनेतर्फे कोल्हापुरात आज निषेध फेरी देखील काढण्यात आली. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील एका थिएटरमधील कन्नड सिनेमाचे शो बंद पाडले आहेत.

कोल्हापूर – कर्नाटक बससेवा रद्द

सीमाप्रश्न वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून कोल्हापुरात येणाऱ्या सगळ्या बससेवा रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्याविरोधात वादग्रस्त विधान केले. त्यानंतर कोल्हापूर आणि कर्नाटक या दोन्ही शहरात तणाव निर्माण होऊन आंदोलन करण्यास सुरुवात झाली.

- Advertisement -

या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेकडून प्रति आव्हान करण्यात आले की, आम्ही कर्नाटकात येतो आम्हाला किती जणांना गोळ्या घालायच्या आहेत त्या घाला. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून कोल्हापुरात येणाऱ्या सर्व बस बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय बेळगावात शनिवारी दुकानांवरील मराठी पाट्या देखील फोडण्यात आल्या. तसेच आता जोपर्यंत हा तणाव निवळत नाही तोपर्यंत या दोन्ही शहरातील बस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि कर्नाटक प्रवाशांना या अडचणीचा सामना करावा लागणार आहे.


हेही वाचा – वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही – अमृता फडणवीस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -