घरमहाराष्ट्रनिवडणूक निकालावर कोट्यवधींचा सट्टा

निवडणूक निकालावर कोट्यवधींचा सट्टा

Subscribe

सट्टेबाजांचा कौल आघाडीला

राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध वाहिन्यांच्या मतदानोत्तर अंदाजात भाजप-सेना युतीकडे कौल दाखवण्यात आला असला तरी सट्टाबाजारात मात्र आघाडीकडे कल दर्शवण्यात आला आहे. या अंदाजानंतर सट्टाबाजारातही उलथापालथ सुरू झाली असून, प्राप्त माहितीनुसार यावर आतापर्यंत सुमारे २० हजार कोटींचा सट्टा लावण्यात आल्याचे सांगितले जाते.

सोमवारी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. हे मतदान पार पडल्यावर विविध वाहिन्यांच्या मतदानोत्तर अंदाजात युतीला मोठे यश मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सरासरी २०० जागा जिंकून युती सत्तेवर विराजमान होण्याचे अंदाज चाचणीतून वर्तवण्यात आले असले तरी निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षांनी विशेषत: राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आणलेली जान आणि त्यांच्या प्रचार सभांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागतील, असे अंदाज सट्टा बाजारात वर्तवले जात आहेत. या निकालाच्या पार्श्वभूमीवर सट्टाबाजारही सज्ज झाला आहे.

- Advertisement -

या निवडणुकीचे निकाल गुरुवारी येतील. त्यादृष्टीने सट्टाबाजारात उलथापालथ सुरू झाली आहे. या बाजारात ‘सुजान’ नामक सट्टेबाजाने शेवटच्या टप्प्यातील प्रचारातील रंगत लक्षात घेत आघाडीच्या पारड्यात यश असल्याचे म्हटले असून, सुमारे १३५ जागा महाआघाडीला मिळतील, असे अनुमान काढले आहेत. ‘धिरज’ सट्टेबाजाने तर आघाडीला सत्तेची संधी दिली आहे. राष्ट्रवादीला ७० आणि काँग्रेसला ७७ जागांचा अंदाज वर्तवला आहे. अपक्षांच्या मदतीने राज्यात आघाडीची सत्ता येईल, असा अंदाज ‘धिरज’ ने वर्तवला आहे. ‘अझमत’ने युती आणि आघाडीचे बळ केवळ २२ आमदारांनी कमी असेल, असा अंदाज काढला आहे. तर ‘अराफत’ने युतीतील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप स्वबळावर सरकार स्थापण करेल, असे म्हटले आहे.

भाजपने ‘अबकी बार 220 पार’ चे लक्ष्य ठेवले होते. बहुतेक अंदाजात भाजपला १२० जागा दर्शवल्या जात असल्या तरी ‘अराफत’ने मात्र भाजपला १५४ जागा दर्शवल्या आहेत. युतीला 2३3 आणि काँग्रेस-राष्ट्रवादी केवळ ५५ जागा मिळतील, असा अंदाज दिला आहे. मतदानोत्तर चाचणीत युतीला मुंबईत ३२ जागा दर्शवल्या जात असल्या तरी सट्टाबाजारात मात्र २२ जागांचा अंदाज देण्यात आलाय. एकूणच सट्टाबाजार तेजीत असून, आज त्यात आणखी भर पडेल, असे ‘धिरज’ म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -