घरमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्षपद निवडणूक २८ तारखेला सुनील केदार यांचेही नाव शर्यतीत

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक २८ तारखेला सुनील केदार यांचेही नाव शर्यतीत

Subscribe

राज्यात हिवाळी अधिवेशनाला तीन दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अद्यापही झालेली नाही. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना काल पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र, या पत्राला राज्यपालांच्या सचिवालयाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. अध्यक्षपदाची निवड अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी म्हणून २८ डिसेंबर या दिवशी होणार असल्याने सोमवारी उमेदवारी अर्ज भरले जातील, असे सांगण्यात आले.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना काल पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, राजभवनातून या पत्राला प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे आता राज्यपालांची संमती गृहित धरून सोमवारी निवडणुकीचा कार्यक्रम विधानमंडळात घेण्याचे ठरले. उद्या संध्याकाळपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे, असे नाना पटोले म्हणाले. काँग्रेसमधल्या चार नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे आणि के.सी.पाडवी यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

- Advertisement -

परंतु विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव अग्रस्थानी असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे. दरम्यान, पत्रकारांनी यावर प्रश्न विचारला असता, पक्ष जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिली होती. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचा उमदेवार देणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारकडून नियमावलीत बदल करण्यात आला आहे. यंदाची निवडणूक प्रत्यक्ष मतदानाऐवजी आवाजी मतदानाने होणार आहे.

केदार यांचेही नाव शर्यतीत
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, के. सी. पाडवी यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. या दोन नावांमध्ये आता नव्याने राज्याचे पशू आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचेही नाव पुढे आले आहे. अधिवेशनाच्या दोन दिवसांपासून केदार यांचे नाव अध्यक्षपदासाठी घेतले जात होते. त्यांच्याकडील मंत्रिपद नाना पटोले यांना देण्याबाबतची चर्चा दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -