घरमहाराष्ट्रराज्यात लवकरच नवे तुरुंग सुरु होणार; ओव्हर क्राऊडेड तुरुंगावर सरकारचा निर्णय

राज्यात लवकरच नवे तुरुंग सुरु होणार; ओव्हर क्राऊडेड तुरुंगावर सरकारचा निर्णय

Subscribe

नवीन तुरुंग बांधण्यासाठी जागा निश्चित झाली असून निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील तुरुंग ओव्हर लोड झाले आहेत. तुरुंगातील कैदी आणि कर्मचाऱ्यांची अवस्था दयनीय बनली आहे. राज्यातील तुरुंगात २०१२ ते २०१७ या पाच वर्षात ४६ कैद्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे. त्यामुळे असलेल्या तुरुंगाचा विस्तार आणि नवीन तुरुंग बांधणार का? असा प्रश्न काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्षवेधीद्वारे विचारला होता. यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री रणजीत पाटील म्हणाले की, यवतमाळ, अहमदनगर, गोंदीया येथे नवीन तुरुंग होणार आहेत. तर येरवडा आणि मंडाले तुरुंगाचा विस्तार केला जाणार आहे. नवीन तुरुंग बांधण्यासाठी जागा निश्चित झाली असून निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे.

तुरुंगातील मृत्यू कमी होण्यासाठी तसेच कैद्यांना समुपदेशन करण्यासाठी तुरुंगातच चांगले डॉक्टर नेमण्यात येतील का? असाही प्रश्न हर्षवर्धन सकपाळ यांनी विचारला होता. यावर उत्तर देताना रणजीत पाटील म्हणाले की, तुरुंगातील दवाखाने रेफरल बनले आहेत. तिथून कैद्यांना बाहेरील हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते. म्हणजे त्यांना मोकळे वातावरण मिळते, नातेवाईकांची भेट घेत येता. तुरुंगात काम करणारे एमएसडब्लू सोशल वर्कर, काऊंसलर या सर्वांच्या कामाची तपासणी करून ऑडिट केले जाईल, असे आश्वासन रणजीत पाटील यांनी दिले.

- Advertisement -

तुरुंगातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी आमदार हरिष पिंपळे, संजय केळकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना रणजीत पाटील म्हणाले की, विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी हे कैद्यांच्या समस्यावर काम करत आहेत. किरकोळ गुन्ह्यातील कैदांना जामीन देण्यासाठी टाटा ट्र्स्टतर्फे मदत केली जाते. ज्यांना जन्मठेप मिळालेली आहे. त्यांची वागणूक चांगली असेल तर त्यांच्या शिक्षेत काही प्रमाणात कपात करण्यात येते. जे कैदी वृद्ध आहेत त्यांना इतर ठिकाणी हलवता येईल का? यावर विचार करू. तसेच कोणत्याही परिस्थितीत तुरुंग ओव्हर क्राऊडेड होणार नाहीत, याचीही काळजी घेऊ, असे रणजीत पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -