घरमहाराष्ट्रअत्यावश्यक सेवांच्या कर्मचार्‍यांमुळे वडाळा-शिवडीकरांचे टेन्शन वाढले

अत्यावश्यक सेवांच्या कर्मचार्‍यांमुळे वडाळा-शिवडीकरांचे टेन्शन वाढले

Subscribe

केईएम, टाटा, महात्मा गांधी रुग्णालय, टाटा रुग्णालय, क्षय रुग्णालय तसेच बेस्ट वसाहत, नायगाव पोलिस वसाहत, बीडीडी पोलिस इमारती, काळाचौकी पोलिस आदी प्रमुख रुग्णालय,अत्यावश्यक सेवांच्या कर्मचार्‍यांच्या वसाहतींचा भाग असलेल्या या वडाळा-शिवडी विधानसभा क्षेत्र मोडणार्‍या एफ-दक्षिण विभागात मागील महिन्यांपासून रुग्णांची भर अधिक पडू लागली आहे. सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष, माजी महापौर, माजी बेस्ट समिती अध्यक्ष आदींसह कर्तव्यदक्ष नगरसेवक असलेल्या या प्रभागात रुग्णांची संख्या नियंत्रणात आणली जात असली तरी अत्यावश्यक सेवांच्या कर्मचार्‍यांमुळेच याचा संसर्ग अधिक होत आहे. तरही कोरोना वॅरियर्स तसेच इमारती,सोसायटींमध्ये निर्माण केलेल्या कोविड योध्दयांच्या मोठ्या योगदानामुळे आरोग्य सेवांवरील भार हलका करतानाच याचा संसर्ग रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला आहे.

एफ-दक्षिण विभागात आतापर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या २४००च्या लगबग पोहोचली आहे. त्यातील आतापर्यंत ८३२ रुग्ण बरे झाले असून १४८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या विभागात क्षयरोग, केईएम, वाडिया, आणि टाटा ही चार प्रमख रुग्णालये आहेत. यातील टाटा रुग्णालयात उपचारासाठी इतर राज्यातून अनेक रुग्ण आले असून त्यातील १५० ते २०० रुग्ण बाधित आहेत. नायगाव न्यू पोलिस वसाहत, पोलिस वसाहत, बीडीडी चाळ पोलिस, काळाचौकी पोलिस वसाहत अशांमध्येच सुमारे ४००हून अधिक बाधित रुग्ण आहेत. नगरसेवक सचिन पडवळ यांनी कोविड वॅरियर्सची संकल्पना राबवून ५० जणांची टीम तयार केली. त्यांच्या मदतीने करोनावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- Advertisement -

अत्यावश्यक सेवांचेच ६० टक्के कर्मचारी बाधित
महापालिकेच्या एफ-दक्षिण विभागात जेवढे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातील ६० टक्के रुग्ण हे अत्यावश्यक सेवेतील आहेत. पोलिस, आरोग्य, महापालिका आदींचे कर्मचारी आहे. केईएम, टाटा, ग्लोबल, नेव्ही आदींसह पोलिस, बेस्ट कर्मचारी व महापालिका कर्मचार्‍यांचा समावेश आहे.
-स्वप्नजा क्षिरसागर, सहायक आयुक्त, एफ-दक्षिण विभाग

माझ्या प्रभागात एकूण बाधित रुग्णांची संख्या १९०च्या लगबग झाली. त्यातील १७३ रुग्ण कंटेन्मेंट झोनमधीलच आहे. सुरुवातील वडाळा व्हिलेजमध्ये मोठ्याप्रमाणात संसर्ग झाला. आता याठिकाणी एकही रुग्ण नाही.
-अमेय घोले, स्थानिक नगरसेवक,आरोग्य समिती अध्यक्ष

- Advertisement -

शिवडी मार्केटजवळील गणेश नगर तसेच अन्य ठिकाणी काही रुग्ण होते. परंतु आता त्यातील बहुतांशी रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. रुगालयात जागा उपलब्ध न होणे तसेच रुग्णवाहिका याच प्रमुख समस्या आहेत.
-श्रध्दा जाधव, स्थानिक नगरसेविका,शिवसेना.

माझ्या प्रभागात १३५ रुग्ण आढळून आले आहे. गोपाळबाग, शिवडी बीडीडी याठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. गोपाळबाग येथे पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर याठिकाणी २२ जणांची चाचणी केली. त्यात १६ रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे २ मे रोजी तापाच्या दवाखान्यामार्फत वैद्यकीय शिबिर राबवले.
-सचिन पडवळ, स्थानिक नगरसेवक,शिवसेना

रामदूत, रघुवीर सदन, कृष्णनगर आदी ठिकाणी रुग्ण असून त्यातील बहुतांशी रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णवाहिका तसेच खाटांची समस्या तेवढी जाणवली नाही. केईएम, महात्मा गांधी रुग्णालय, ग्लोबल अशा ठिकाणी योग्यप्रकारे रुग्ण दाखल केले जात आहेत.
-सिंधू मसुरकर, स्थानिक नगरसेविका, शिवसेना

पोलिस वसाहत आणि पोलिस हेडक्वार्टस माझ्या प्रभागात आहे. सर्वाधिक पोलिसच कोरोनाबाधित होत आहे. शिवडी क्रॉस रोडला सुरुवातीला रुग्ण वाढले होते. त्यामुळे त्याठिकाणी वैद्यकीय शिबिर राबवून आतमध्ये घुसुन तपासणी करण्यात आली होती. त्यामुळे तेथील प्रमाण कमी झालेत.
-सुप्रिया सुनील मोरे, स्थानिक नगरसेविका, काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -