Friday, April 26, 2024
घरमानिनीBeautyBeauty : सुंदर दिसण्यासाठी क्रिम पावडरच्या मागे धावू नका, तर करा 'या'...

Beauty : सुंदर दिसण्यासाठी क्रिम पावडरच्या मागे धावू नका, तर करा ‘या’ पदार्थाचे सेवन

Subscribe

सुंदरता ही प्रत्येक स्त्रीची जवळचुई गोष्ट आहे. सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक स्त्रीचा अट्टाहास असतो. यासाठी प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने कॉस्मेटिक गोष्टींचा वापर करत असतो. तसेच आजच्या युगात प्रत्येकाला सुंदर दिसावे असे नेहमी वाटतं. पण रोजच्या धावपळीमुळे आणि उलट सूलट आहारामुळे सुंदर दिसण्याचे किंवा स्वतःची काळजी घेणे हे राहूनच जाते. अशा परिस्थितीत आहारात संतुलन राखणे आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे, तरच तुम्ही त्वचेची आंतरिक काळजी घेऊ शकाल.

18 Superfoods for Glowing Skin, According to Dermatologists | Allure

- Advertisement -

बाहेरील वातावरणाशी आपली त्वचा कायम चांगली राहत नसते. यासाठी आपल्या शरीरात पालेभाज्या किंवा फळांचा पोषक आहार पोटात जायला हवा. तसेच आरोग्य तज्ज्ञांच्या मते त्वचेची आतूनही काळजी घेतली पाहिजे. तर ती चमकदार दिसेल, जे योग्य पोषण आणि आहारामुळेच शक्य आहे. त्वचा आतून-बाहेरून चमकण्यासाठी आहारात अशा गोष्टींचा समावेश करा, ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर दिसते.

आहारात करा या पदार्थांचे सेवन-

- Advertisement -
  • हिरव्या भाज्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठीही फायदेशीर असतात.
  • मेथी, पालक, दुधी भोपळा इत्यादींचा आहारात समावेश करा.
  • या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, लोह आणि ए आणि सी सारखी जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.
  • आठवड्यातून दोनदा तरी या भाज्यांचे सेवन करायला हवे.
  • शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास लिंबाचा रस पिया.
  • मौसमी फळे नियमित खावी. त्यामुळे प्रत्येक मोसमात शरीराला योग्य फळांमुळे एनर्जी मिळते.

11 Best Foods Good for Skin: Get That Healthy, Glowing Skin Now

  • त्वचेसाठी मासे खूप फायदेशीर आहे.
  • माशांमध्ये ओमेगा-3 मुबलक प्रमाणात असते. तसेच केस काळे आणि दाट होण्यास मदत होते.
  • ब्राऊन राईस त्वचा निरोगी बनवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. याच्या आत लिपिड्सचे घटक असतात.
  • ज्यामुळे त्वचेतील ओलावा तर कायम राहतो.
  • डाळिंबात अँटीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात, ज्याच्या सेवनाने शरीरात लाल रक्तपेशी तयार होतात.
  • शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम असल्यास डाळिंबाच्या सेवनाने ही जखम लवकर भरून येते.
  • याच्या सेवनाने त्वचेवर लालसरपणा येतो आणि यामुळे त्वचा गलोविंग दिसते.

हेही वाचा : Beauty : उन्हाळयात वापरा ‘हे’ 3 फेस मास्क, स्किनवर येईल चमकदार ग्लो

- Advertisment -

Manini