घरदेश-विदेशcigarette बाबत इशारा देणारा 'कॅनडा' पहिला देश; 'स्लो पॉयझन'बद्दल करणार जनजागृती

cigarette बाबत इशारा देणारा ‘कॅनडा’ पहिला देश; ‘स्लो पॉयझन’बद्दल करणार जनजागृती

Subscribe

नवी दिल्ली : cigarette मुळे आरोग्यावर परिणाम होता, पण त्याकडे कोणी लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे कॅनडा सरकार प्रत्येक सिगारेटवर आरोग्यावर होणारा परिणाम या आशयाचे संदेश लिहिणार आहे. त्यामुळे कॅनडा सरकार असा निर्णय घेणार पहिला देश बनला आहे. (Canada first country to warn about cigarettes)

सिगरेटमुळे आरोग्यावर परिणाम होतो अशा आशयाचे संदेश सिगरेटच्या प्रत्येक पाकिटावर लिहिलेले असतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून बहुतेकजण सिगरेट ओढताना दिसतात. पण या लोकांना स्वत:चा जीव वाचविण्याची जाणीव व्हावी आणि त्यांनी धुम्रपान सोडावे यासाठी कॅनडा सरकारने मोठा निर्णय घेतला. कॅनडा सरकार प्रत्येक सिगरेटवर ‘तंबाखूच्या धुरामुळे मुलांना त्रास होतो’, ‘सिगारेटमुळे ल्युकेमिया होतो’, ‘विष प्रत्येक पफमध्ये आहे’ अशा आशयाचे संदेश लिहिणार आहे.

- Advertisement -

सिगारेट अनेक रोगांचे कारण
कॅनडाचे आरोग्यमंत्री जीन-यवेस ड्युक्लोस यांनी अलीकडेच एका निवेदनात म्हटले की, तंबाखूचा वापर ही कॅनडातील सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. आमचे सरकार कॅनेडातील लोकांचे, विशेषत: तरुणांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. यापुढे तंबाखूजन्य पदार्थामुळे होणारे नुकसान सिगरेटवर लिहिले जाईल. यामुळे लोक ते वाचतील आणि स्वतःला सिगरेटच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी वचनबद्ध होतील.

नियम १ ऑगस्टपासून होणार लागू 
कॅनडा सरकारने 2035 पर्यंत तंबाखूचे सेवन 5 टक्क्यांनी कमी करणे आणि प्रौढांना धूम्रपान सोडण्यास मदत करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यामुळे कॅनडा सरकारने युवकांना सिगरेटच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे कॅनडा सरकारने एका निवदेनात बुधवारी (31 मे) सांगितले की, प्रत्येक सिगरेटवर आरोग्यविषयक संदेश छापणे आवश्यक आहे. नवीन नियम 1 ऑगस्टपासून लागू होतील, तर तंबाखू उत्पादने विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना एप्रिल 2024 च्या शेवटपर्यंत नवीन सूचना सिगरेटवर लिहाव्या लागतील.

- Advertisement -

सिगारेट ओढण्याचे नुकसान
1. फुफ्फुस, घसा, तोंड, अन्ननलिका, स्वादुपिंड, मूत्राशय, मूत्रपिंड आणि गर्भाशय ग्रीवाच्या कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.
2. हिरड्यांचे आजार, दात किडणे, श्वासाची दुर्गंधी आणि तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
3. श्वसनसंस्थेला हानी पोहोचते, ज्यामुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) आणि क्रॉनिक ब्रॉन्कायटिस सारखी परिस्थिती उद्भवते.
4. हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि परिधीय धमनी रोग होण्याचा धोका अधिक वाढतो.
5. धूम्रपान करणार्‍यांना न्यूमोनिया, ब्राँकायटिस आणि इन्फ्लूएन्झा यासह श्वसन संक्रमण होण्याची अधिक शक्यता असते.
6. स्त्री आणि पुरुष दोघांची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -