घरमुंबईदुर्मिळ हृदयरोगातून वाचला ११ वर्षीय मुलाचा जीव

दुर्मिळ हृदयरोगातून वाचला ११ वर्षीय मुलाचा जीव

Subscribe

'सुप्रोवल्वर ऑर्टिक स्टेनोसिस' या दुर्मिळ हृदयरोगानेग्रस्त ११ वर्षीय नागपूरच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

नांदेडच्या एका ११ वर्षीय मुलाचे आयुष्य हृदयाच्या दुर्मिळ आजारामुळे अगदी थांबून गेले होते. या मुलाला ‘सुप्रोवल्वर ऑर्टिक स्टेनोसिस’ हा दुर्मिळ हृदयाचा आजार झाला होता.

संदेशला लहानपणापासून दमा, छातीचे दुखणे

संदेशला लहानपणापासून दम लागणे आणि छातीत दुखणे असा आजार होता. स्थानिक डॉक्टरांना दाखवूनही त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली नव्हती. नानावटी हॉस्पिटलने भरवलेल्या एका शिबिरात या रूग्णाला ‘सुप्रोवल्वर ऑर्टिक स्टेनोसिस’ हा आजार झाल्याचे निदान झाले. संदेशच्या आजारात असलेल्या गुंतागुंतीमुळे शस्त्रक्रिया हा एकच पर्याय होता. नांदेडमध्ये भरवण्यात आलेल्या शिबिराद्वारे संदेशला शस्त्रक्रियेसाठी मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार संदेशच्या पालकांनी नानावटी रूग्णालय गाठले. मे महिन्यात संदेशची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आठवडाभरातच संदेशला डिस्तार्ज देण्यात आला. या शस्त्रक्रियेविषयी संदेशच्या वडीलांनी समाधान व्यक्त केलं.

- Advertisement -

अत्यंत दुर्मिळ हृदयरोग

याविषयी अधिक माहिती देताना कन्सल्टंट कार्डिओव्हास्क्युलर अॅण्ड थोरॅसिस सर्जन डॉ. रोहित शहापूरकर यांनी सांगितले की, “ त्याची महाधमनी (ईओर्टा), जी हृदयातून सुरू होऊन संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पुरवते, ती खूप संकुचित होऊन फक्त २ सेंमी राहिली होती. या स्थितीला ‘सुप्रोवल्वर ऑर्टिक स्टेनोसिस’, असे म्हणतात. हा अत्यंत दुर्मिळ असा जन्मजात हृदय रोग आहे आणि त्यावरील उपचारही अवघड आहेत.”

अशी झाली शस्त्रक्रिया

डॉ. शहापूरकर पुढे म्हणाले की, ”शस्त्रक्रियेदरम्यान संदेशचं हृदय थांबवण्यात आलं होतं. महाधमनी उघडून त्यातील संकुचित झालेल्या भागावर काम करण्यात आलं. हृदयाच्या कव्हरिंग सॅकपासून (पेरीकार्डियम) बनवलेल्या तीन पॅचेसचा उपयोग करून महाधमनीच्या सुरुवातीला असलेला संकुचित भाग मोठा करण्यात आला. याला ट्रिपल पॅच टेक्निक म्हणतात.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -