घरमुंबईखोपोली बोरघाटात बस दरीत कोसळली अपघातात १३ ठार, २८ जखमी

खोपोली बोरघाटात बस दरीत कोसळली अपघातात १३ ठार, २८ जखमी

Subscribe

ढोल-ताशा पथकाला पुण्याहून मुंबईला घेऊन निघालेली खासगी बस खंडाळा बोरघाटातून जुन्या महामार्गावरून नो इंट्रीतून उतरत असताना उतारावरील तीव्र वळणाचा अंदाज न आल्यामुळे २०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात घडल्याची घटना शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. यात १३ जणांचा मृत्यू, तर २८ जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनासह स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जवळपास ५ ते ६ तास युद्धपातळीवर बचावकार्य राबविण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोरघाटातील अपघातस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी अपघाताची माहिती घेत या अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. तसेच, सर्व जखमींचा वैद्यकीय खर्च शासकीय निधीमधून करण्यात येईल, असे जाहीर केले.

- Advertisement -

मुंबईतील गोरेगाव येथील बाजीप्रभू झांज पथक पिंपरी येथे खासगी बसद्वारे गेले होते. त्यात खोपोलीतील तीन मुले होती. रात्री मुंबईकडे जात असतानाच खोपोलीतील सहकार्‍यांना सोडण्यासाठी जुन्या महामार्गावरील खंडाळा बोरघाटातून बस उतरत असतानाच बस २०० फूट खोल दरीत कोसळली. अपघातात बसचा चेंदामेंदा झाला. १३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. जखमी मुले मदतीसाठी याचिका करत होती. बसमधील कार्तिक नावाच्या तरुणाला सुदैवाने कोणतीही इजा झाली नव्हती. त्यामुळे त्याने तात्काळ १०८ आपत्कालीन विभागाला कॉल केला. त्यानंतर तेथील काकडे यांनी अपघातग्रस्त टीमचे गुरूनाथ साठेलकर यांना माहिती दिली. त्यांनी आपल्या टीमसोबत तात्काळ मदतकार्य सुरू केले.

शिवदुर्ग रेस्क्यू पथक लोणावळा, मावळ रेस्क्यू पथक, यशवंती हायकर्स, देवदूत टीम, खोपोली पोलीस, पालिकेचे फायरब्रिगेड दल यांनी तात्काळ मदतकार्य केल्यावर सर्व जखमींना रोपच्या साह्याने वेळप्रसंगी खांद्यावर टाकून बाहेर काढून खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आणण्यात आले. जखमींची संख्या मोठी असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता वानखेडे, इंचार्ज संगिता कोजगे (टायडे) यांच्या टीमला उपचारासाठी मदकार्य करण्यासाठी शहरातील डॉ. प्रमोद वानखेडे, डॉ. नगरगोजे, डॉ.पाटील, डॉ. अधिकारी आदिंनी मदकार्य केले. गंभीर जखमींना कामोठे येथे हालविण्यात आले.

- Advertisement -

रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घुर्गे, तहसीलदार अयुब तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खोपोली नगरपरिषद मुख्यधिकारी अनुप दुरे, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खोपोलीचे पोलीस निरिक्षक शिरीष पवार मदतकार्य मिळवून देण्यासाठी घटनास्थळावर उपस्थित होते. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते.

मृतांच्या वारसांना ७ लाखांची मदत
अपघातातील जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांच्या टीमकडून जाणून घेतली. यानंतर त्यांनी तातडीने या अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ७ लाख रुपयांची मदत आणि जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील, असे जाहीर केले.

=मृतांची नावे
जुई दीपक सावंत
यश सुभाष यादव
स्वप्निल धुमाळ
वीर कलेश मांडवकर
वैभवी साबळे
सतीश धुमाळ
मनीष राठोड
हर्षदा परदेशी
अभय साबळे
महेश पुजारी
अनिकेत जगताप
कृतिक रोहित
राहुल गोठवाल

=जखमींची नावे
हर्ष पालके
नम्रत गवणूक
जयेश तुकाराम नाराळकर
महेश म्हात्रे
चंद्रकांत गुडेकर
लवकुष प्रजापती
शुभम गुडेकर
सनी राघव
यश सकपाळ
ओम कदम
आशिष गुरव
रुचिका हुमाने
विशाल विश्वकर्मा
ऋषभ कोराबे
मुसेफ खान
अभिजित जोशी
कोमल चीले
ओमकार पवार
हर्ष धुरी
मोहक सालाप
संकेत चौधिकर
रोशन शेलार
दिपक विश्वकर्मा
निखिल पालकर
अर्थव कांबळे
सुरेश अर्मुकाम
कार्तिक भानू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -