घरमुंबईबैठकीला गैरहजर असलेल्या नगरसेविकेची बोगस सही

बैठकीला गैरहजर असलेल्या नगरसेविकेची बोगस सही

Subscribe

भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आलेल्या स्थायी समितीच्या बैठकीला गैरहजर असलेल्या शिवसेना नगरसेविकेची खोटी सही केल्याचा धक्कादायक प्रकार मीरा भाईंदर महापालिकेत घडला आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सदस्या शिवसेना नगरसेविका तारा घरत यांनी बैठकीला हजर नसतानाही बनावट सही केल्याची तक्रार केली आहे. मागच्या महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीला आपण हजर नसतानाही ही सही करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे या बैठकीला फक्त सात सदस्य हजर होते. कोरम पूर्ण होण्यासाठी आठ सदस्यांची आवश्यकता असते. हा कोरम पूर्ण करून कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यासाठी आपली खोटी सही केल्याची घरत यांची तक्रार आहे.

- Advertisement -

बैठकीला भाजपचे सहा आणि काँग्रेसचा एक मिळून सात सदस्य हजर होते. असे असतानाही बैठक उरकण्यात आली. घरत गैरहजर असताना हजेरी बुकावर त्यांची कुणी सही केली याचा शोध घेतला जात आहे. घरत यांनी याप्रकरणी महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडेही तक्रार केली आहे.

त्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित नसतानासुद्धा माझी बोगस सही करून मी उपस्थित असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार फारच भयंकर आहे. म्हणून असे कृत्य करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई व्हायला पाहिजे. तशी तक्रार मी दिली आहे.
—तारा घरत, नगरसेविका

- Advertisement -

जर असे कृत्य होत असेल तर फारच भयंकर आहे. असे कृत्य करणार्‍यावर तातडीने कारवाई करून मंजूर झालेल्या निविदांची चौकशी व्हायला हवी.
—रोहित सुवर्णा, माजी नगरसेवक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -