घरमुंबईAbhishek Ghosalkar : ...अधुरी एक कहाणी; लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची भावूक...

Abhishek Ghosalkar : …अधुरी एक कहाणी; लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची भावूक पोस्ट

Subscribe

zमुंबई : उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा याच्या कार्यालयात हत्येचा हा थरार घडला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, व्हॅलेंटाईन डे हा अभिषेक घोसाळकर यांच्या लग्नाचा वाढदिवस. ऍनिव्हर्सरी निमित्त ते बाहेर फिरायला जाणार होते. परंतु, त्याआधीच विपरित घडले आणि त्यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर एकट्या पडल्या. व्हॅलेंटाईन दिनानिमित्त त्यांनी अभिषेक घोसाळकर यांच्याच फेसबुक पेजवरून एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीला त्यांनी ‘अधुरी एक कहाणी’ हे गाणंही जोडलं आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : माझे हिंदुत्व मुसलमानांनाही कळले, पण यांचे काय? ठाकरेंचा भाजपाला टोला

- Advertisement -

कुटुंबवत्सल जोडपं

अभिषेक घोसाळकर आणि त्यांची पत्नी तेजस्विनी घोसाळकर हे दोघेही उद्धव गटाचे नगरसेवक. दोघेही राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. तेजस्विनी घोसाळकर या अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबर सावलीप्रमाणे असत. प्रत्येक कार्यात दोघेही जोडीने काम करत, असं तेथील स्थानिक सांगतात. राजकारणात सक्रिय असले तरीही हे जोडपं कुटुंबवत्सल होतं. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने त्यांचा बाहेर फिरायला जायचा प्लॅन होता मात्र अभिषेक यांची हत्या झाल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.

हेही वाचा – IND vs ENG Test: तिसऱ्या कसोटी सामन्यातून बुमराह बाहेर? ‘अशी’ आहे भारतीय संघाची प्लेइंग 11

- Advertisement -

पोस्टमध्ये काय ?

अभिषेक घोसाळकर आणि तेजस्विनी घोसाळकर यांचा व्हॅलेंटाईन डे दिवशी लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्त तेजस्विनी घोसाळकर यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या फेसबुक वॉलवर एक स्टोरी शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात, “स्वर्गात असलेल्या माझ्या प्रिय नवऱ्यासाठी. मला संपूर्ण आयुष्य तुमच्यासोबतच घालवायचं होतं. मला माहितेय की, तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम केलंत आणि आता पुन्हा भेटेपर्यंत तुम्ही वरूनही माझ्यावर असेच प्रेम करत रहाल. लग्नाच्या वाढदिवसाच्या स्वर्गीय शुभेच्छा. मला तुमची फार आठवण येते.” या स्टोरीमध्ये तेजस्विनी घोसाळकर यांनी अभिषेक घोसाळकर यांच्यासोबतच काही खास क्षण शेअर केले आहेत.

https://www.facebook.com/reel/1571126883712212

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -