घरमुंबईबेकायदा बांधकामांवर धडक कारवाई

बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई

Subscribe

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात अवैध बांधकामे वाढली आहेत. याबाबत पालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे नागरिकांनी अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. त्या तक्रारींची दखल घेऊन आयुक्तांनी पालिकेच्या पाचही प्रभाग अधिकार्‍यांना अनधिकृत बांधकामांवर तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.

जमीन मालक राजेश दुमाडा व विकासक रशीद मुल्तानी यांनी पालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता चावींद्रा हद्दीतील जमिनीवर सुमारे 8 हजार चौरस फुटांचे बांधकाम केल्याचे आढळून आल्याने या टोलेजंग गोदामांवर अतिक्रमण पथक व जेसीबी मशीन वापरून ही बांधकामे पाडण्यात आली.

- Advertisement -

तर प्रभाग समिती क्र.5 चे सहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे यांनी कामवारी नदीच्या पात्रालगत कलीमुद्दीन खान यांनी सीआरझेडचे उल्लंघन करून निर्माण केलेले आरसीसी बांधकाम जेसीबीने तोडून टाकले आहे. तसेच पांजरापोळ येथे रजा मशिदीलगत बांधण्यात आलेल्या तीन अनधिकृत व्यावसायीक गाळ्यांवरदेखील धडक कारवाई करून ही बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. शिवाय म्हाडा कॉलनी येथे रस्त्यावर भरणार्‍या भाजी मार्केट व्यापार्‍यांवर धडक कारवाई करून वाहतुकीचा अडथळा दूर केला आहे. पालिका सहाय्यक आयुक्तांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -