घरमुंबईमुंबईची हवा बिघडली

मुंबईची हवा बिघडली

Subscribe

मुंबईमध्ये हवेचे प्रदूषण वाढले आहे. हवेमध्ये मिसळणाऱ्या धूलिकणांचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरण मळभ दिसत आहे. हवेमध्ये मिसळणाऱ्या धूलिकणांचे प्रमाण ३४१ पर्टिक्युलेट मॅटरपर्यंत पोहोचले आहे.

दिल्लीपाठोपाठ आता मुंबईमध्येही हवेचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढते वायू प्रदूषण ही मुंबईमधील एक गंभीर समस्या बनली आहे. मुंबईमध्ये वाढणात्या वायू प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडू लागला आहे. सध्या मुबंईत थंडीचे वातावरण आहे. तरीदेखील मुंबईच्या हवेमध्ये असंख्य धूलिकण मिसळत आहे. सोमवारी या हवेच्या प्रदूषणाने मुंबईमध्ये सर्वाधिक उच्चांक गाठला. ‘सफर’ संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या पश्चिम उपनगरामधील काही भागांमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये वांद्रे-कुर्ला संकुल या भागामध्ये सर्वाधिक असे वायू प्रदूषण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल अंधेरी, मालाड, बोरीवली, चेंबूर, माझगाव, कुलाबा, वरळी, भांडूप यांचा नंबर लागतो.

हेही वाचा – हवा बदलामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात

- Advertisement -

इतके होते वायू प्रदूषण

सफर या संकेतस्थळावर वातावरणातील प्रदूषणाची नोंद केली जात आहे. सफरने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुल येथे सर्वाधिक असे ३४१ पर्टिक्युलेट मॅटर धूलिकणांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल अंधेरी येथे ३३९ पर्टिक्युलेट मॅटर धूलिकणांची नोंद झाली आहे. मालाड येथे ३११, बोरीवलीमध्ये २८७, कुलाबा १४५, वरळी १३९ पर्टिक्युलेट मॅटर इतके धूलिकणांची नोंद झाली आहे. मध्य उपनगरातील भांडूपच्या हवेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात धुलिकण मिसळले आहेत. भांडूपमध्ये ११५ पर्टिक्युलेट मॅटर इतकी धूलिकणांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवी मुंबईच्या चेंबूर येथेही मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाल्याची नोंद सफर या संकेतस्थाने दिली आहे. चेंबूरमध्ये धूलिकणांचा हवेत मिसळण्याचा आकडा तब्बल २३८ पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे दिल्लीसारखी परिस्थिती मुंबईतही होईल, अशी भिती पर्यावरण तज्ज्ञांना भेडसावत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -