घरमुंबईCurrey Road high-rise fire: सिक्युरीटी गार्डाने कुटूंबांना वाचवताना गमावला स्वतःचा जीव

Currey Road high-rise fire: सिक्युरीटी गार्डाने कुटूंबांना वाचवताना गमावला स्वतःचा जीव

Subscribe

करी रोडच्या अविघ्न पार्क टॉवरच्या आगीत १९ व्या मजल्यावर लटकलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ हा शुक्रवारी समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. अरूण तिवारी या ३० वर्षीय तरूणाने तब्बल १५ मिनिटे आगीशी झुंज दिली खरी पण अखेर त्याचा १९ व्या मजल्यावरून कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. अरूण तिवारीच्या निमित्ताने एक महत्वाची अशी माहिती समोर आली आहे. आपला जीव धोक्यात घालून अरूण तिवारी इतर कुटूंबांना आगीच्या बाबतीत अलर्ट करत राहिला. अनेक कुटुंबांना त्याने आगीच्या मजल्यावरून खाली घालवले. पण दरम्यानच्या काळात आगीचे लोट वाढल्याने तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्या आगीच्या आणि धुराच्या लोटातून जीव वाचवण्याच्या प्रयत्नातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग इतकी वाढली की त्या आगीच्या सापळ्यातून स्वतःचा बचाव करणे हे अरूणला शक्य झाले नाही.

करी रोडच्या अविघ्न पार्क इमारतीत आग लागल्याची माहिती ११.५१ वाजता मुंबई अग्निशमन दलाला मिळाली. ६१ मजली टॉवरच्या बी विंगमधून आगीचे लोट बाहेर येत असल्याचे दिसू लागले. या इमारतीत काही दिवसांपूर्वीच लोक रहायला आले होते. पण इमारतीतील बहुतांश घरे ही रिकामीच आहेत. जवळपास ३०० घरांच्या टॉवरमध्ये बहुतांश घरे ही रिकामीच आहेत. लक्झरी फ्लॅट म्हणून ओळख असणाऱ्या इमारतीत ३ बीएचके ते ५ बीएचके असे फ्लॅट्स आहेत. १२ वाजताच्या सुमारास आग वाढत असल्याचे लक्षात येताच अरूण तिवारीने रहिवासी राहत असलेल्या मजल्यांकडे धाव घेतली. त्या घरांमधील नागरिकांना अरूण तिवारीने तत्काळ अलर्ट करत खाली उतरण्यास सांगितले. पण तोवर आगीने अरूणचा पाठलाग करायला सुरूवात केली होती. अरूण इतरांची मदत करत राहिला पण दरम्यानच्या काळात आग वाढली होती. तसेच धुराचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळेच अरूण आगीपासून वाचण्यासाठी १९ व्या मजल्यावरून बाहेर पडायचा निर्णय घेतला. अरूण जवळपास १५ मिनिटे बालकनीवर लटकत राहिला. पण वाढत्या आगीच्या ज्वाला आणि धुरामुळे अरूणची झुंज संपुष्टात आली. टॉवरच्या १९ व्या मजल्यावर लटकलेल्या अरूणचा हात निसटला अन् थेट तो खाली पडला. त्याने खूप वेळ प्रयत्न केला खरा, पण त्याचा हात सटकल्यानंतर मात्र तो थेट तळ मजल्यावर कोसळला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला तत्काळ नजीकच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण केईएमच्या डॉक्टरांनी अरूणचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

अविघ्न पार्कच्या टॉवरमध्ये १९ व्या मजल्यावर एक कुटूंब २० दिवसांपूर्वीच रहायला आले होते. त्यांनी हा फ्लॅट पुर्णपणे फर्निश केला होता. संपुर्ण घरात फर्निचरचे काम पुर्ण झाल्यानंतरच हे कुटूंब याठिकाणी रहायला आले होते. पण फ्लॅट फर्निश असल्याने वेगाने याठिकाणी आग वाढत गेली. सुदैवाने २० व्या मजल्यावर कोणीच राहत नसल्याने त्याठिकाणी आग वाढली नाही. रिकाम्या फ्लॅटमुळे आग वाढण्यासाठी वाव मिळाला नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अन्यथा ही आग झपाट्याने आणखी काही मजल्यांवरही वाढली असती. आग लागलेल्या फ्लॅटच्या शेजारील रहिवाशांनीही तत्काळ खालचा मजला गाठला त्यामुळे जिवितहानी टळली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -