घरCORONA UPDATELockDown: वांद्रे जमावप्रकरणी विनय दुबेला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

LockDown: वांद्रे जमावप्रकरणी विनय दुबेला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Subscribe

वांद्रे जमावप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विनय दुबेला २१ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वांद्रे स्थानकात मंगळवारी जमलेल्या हजारो परप्रांतियांच्या गर्दी प्रकरणी अटक केलेल्या विनय दुबेला कोर्टाने २१ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी रात्री नवी मुंबईतील ऐरोली येथून विनय दुबेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याल वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर काल त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायाधीशांनी ही शिक्षा सुनावली. सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवल्याबद्दल विनय दुबेला अटक करण्यात आली होती. त्याला बुधवारी दुपारी वांद्रे येथील मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले.

मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी रेल्वे न सोडल्यास राष्ट्रव्यापी आंदोलन करू, असा व्हिडिओ विनय दुबे याने त्याच्या सोशल मीडिया साईट्सवर अपलोड केला होता. त्यामुळे कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली असून दुबेच्या वतीने मात्र या आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. वांद्रे येथील मॅजिस्ट्रेट कोर्टात न्यायाधीश यांच्यासमोर आरोपी विनय दुबेला दुपारी हजर करण्यात आले. त्यावेळी समाजमाध्यमांवर अफवा पसरवणारे व्हिडीओ अपलोड केल्यामुळेच मजूर रेल्वे स्थानकात मोठ्या संख्येने जमले असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्या आधारे न्यायाधीशांनी आरोपी विनय दुबे याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एका व्हिडिओद्वारे मजुरांना याप्रकरणी आंदोलन करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत विनोद दुबेच्या विरोधात कलम १७७, १५३(ए), १८८, २६९, २७० आणि ५०५(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लुडो खेळताना आला खोकला, मित्राने झाडली गोळी

काय आहे प्रकरण 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणखी १९ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. त्यानंतर मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारात हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीय मजूर वांद्रे स्थानक परिसरात एकत्र जमले. आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, अशी मागणी या जमावाने केली. दरम्यान, पोलीस आणि स्थानिक आमदार झिशान सिद्धिकी यांनी जमावाची समजूत काढली. कोणीही उपाशी राहणार नाही, असे आश्वस्त केले. वेळप्रसंगी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला. अखेर काही तासांनी ही गर्दी ओसरली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -