घरमुंबईकाळ्या यादीतील कंत्राटदारांचा डाव स्थायी समितीने उधळला

काळ्या यादीतील कंत्राटदारांचा डाव स्थायी समितीने उधळला

Subscribe

वांद्रे भाभा हॉस्पिटल इमारतीचा प्रस्ताव फेटाळला

वांद्य्रातील भाभा हॉस्पिटलच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळत परत प्रशासनाकडे पाठवून दिला. या हॉस्पिटलच्या बांधकामाचे कंत्राट क्वॉलिटी हाईटकॉन प्रायव्हेट कंपनीला देण्यात येत असले तरी या कंपनीच्या आडून काळ्या यादीतील रेलकॉन कंपनी हे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे हा प्रस्तावच दप्तरी दाखल करत काळ्या यादीतील कंत्राटदाराचा हॉस्पिटल उभारणीचे कंत्राट मिळवण्याचा डाव उधळवून लावला.

वांद्रे पश्चिम येथील महाापालिकेच्या के.बी.भाभा हॉस्पिटलचे विस्तारीकरण करण्यात येणार असून पूर्वी असलेल्या तळमजली इमारतीचे बांधकाम पाडून त्याठिकाणी बहुमजली इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर अस्तित्वात असलेल्या बहुमजली इमारतीची दुरुस्ती करून नुतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. २५५ कोटी रुपये खर्च करून हॉस्पिटल इमारत उभारण्यासाठी क्वॉलिटी हाईटकॉन प्रायव्हेट कंपनीची निवड करण्यात आली. जुन्या असलेल्या तळ मजल्याच्या जागेवर ही बहुमजली इमारत उभारली जाणार आहे. त्यामुळे बहुमजली इमारतीचे बांधकाम व नुतनीकरण करण्यात येणार आहे. ४९७ खाटांचे प्रशस्त असे हे हॉस्पिटल उभारले जाणार आहे.

- Advertisement -

याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मागील चार बैठकांमध्ये राखून ठेवण्यात आला होता. परंतु बुधवारी हा प्रस्ताव पुन्हा पुकारण्यात आल्यानंतर सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी संबंधित कंत्राट कंपनीला हॉस्पिटल बांधण्याचा अधिकार नाही. त्यांचा आजवरचा अनुभव हा निवासी इमारत बांधण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हॉस्पिटल बांधण्याचा अनुभव नसताना त्यांना काम कसे दिले जात आहे,असा सवाल केला. तसेच यापूर्वी सात जलतरण तलावाचे कामांचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यांचे काम पूर्ण झालेले नाही. परवानगीअभावी हे काम रखडलेले असून परवानगी न घेता अशाप्रकारे मंजूर केलेली प्रकल्प कामे ही स्थायी समितीच्या मान्यतेनंतरही रखडली जातात, असे सांगत अशा प्रकारच्या कंपन्यांच्या आडून काळ्या यादीतील कंपन्या कामे मिळवत असल्याचा आरोप करत हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला.

मुंबई महापालिकेच्यावतीने चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवल्या जातात. हॉस्पिटलांचे नुतनीकरण आणि अत्याधुनिक यंत्रे खरेदी करता संबंधित यंत्रणा योग्यप्रकारे काम करत नाहीत. त्यामुळे कुठेतरी हे रॅकेट चालले असून ते तोडण्याची गरज आहे. त्यामुळे काळ्या यादीतील कंत्राटदार अशाप्रकारे मागील दाराने कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करणार असतील तर ते सहन केले जाणार नाही. त्यामुळेच भाभा हॉस्पिटलचा प्रस्ताव परत पाठवण्यात आल्याचे यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

कुपर हॉस्पिटलच्या चौकशीचे निर्देश
कुपर हॉस्पिटलच्या कामांसाठी कंत्राटदारची निवड करण्यात आली आहे. यासाठीचा प्रस्ताव वर्षभरापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. परंतु अद्यापही कंत्राटदारांकडून कामाला सुरुवात झालेली नाही. या कामांच्या कंत्राटाच्या कामांची दक्षता विभागामार्फत चौकशी केली जावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -