घरमुंबईदेशमुख यांचा भदाणेबाबतीतील निर्णय योग्य की अयोग्य?

देशमुख यांचा भदाणेबाबतीतील निर्णय योग्य की अयोग्य?

Subscribe

उल्हासनगर महापालिकेतील वादग्रस्त अधिकारी युवराज भदाणे यांनी महापालिकेतील स्थानिक संस्था कर विभागाचा पदभार असताना साडे तीन कोटींचा फायदा करुन दिला होता. मग देशमुख यांचा भदाणेबाबतीतील निर्णय योग्य की अयोग्य?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उल्हासनगर महापालिकेतील वादग्रस्त अधिकारी युवराज भदाणे यांचा स्थानिक संस्था कर विभागाचा पदभार असताना त्यांनी अवघ्या आठ व्यापाऱ्यांचे पुर्ननिर्धारण करून महापालिकेच्या तिजोरीत तीन कोटी जमा केले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या भदाणे यांचा पदभार काढण्याचा निर्णय योग्य की अयोग्य असा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने स्थानिक संस्था कर महापालिकांमध्ये लागू केला होता. हा कर २०१५ पर्यंत सुरु होता. या काळात १५ हजार व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कराची नोंदणी केली होती. २०१५ मध्ये कर बंद झाल्यानंतर या व्यापाऱ्यांनी त्या कराचे अंतिम विवरण सादर करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. यामुळे महापालिकेने निवृत्त विक्री कर अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. या पाच विक्रीकर अधिकाऱ्यांपैकी ३ अधिकारी सोडून गेले. या अधिकाऱ्यांनी अवघ्या ९७० व्यापाऱ्यांचे अंतिम कर निर्धारण केले आहे. त्यामुळे तब्बल १४ हजार ०५० व्यापाऱ्यांचे कर निर्धारण होणे बाकी आहे.

१ कोटी ६९ लाख रुपये जमा

गत मार्च महिन्यात पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी स्थानिक संस्था कराच्या उपायुक्त पदी युवराज भदाणे यांची नेमणूक केल्यांनतर त्यांनी अंतिम कर निर्धारण न केलेल्या १४ हजार ०५० व्यापाऱ्यांच्या नोटीसा काढल्या होत्या. तत्कालीन उपायुक्त जमीर लेंगरेकर, विनायक फासे, निवृत्त विक्री अधिकारी विसपुते यांनी एक हजार व्यापाऱ्यांचे अंतिम निर्धारण करून पालिकेच्या तिजोरीत अवघे २ कोटी ७९ लाख रुपयांची भर टाकली होती. तसेच पाच व्यापाऱ्यांना ९० लाख रुपयांचा परतावा देण्याचे आदेश काढले होते. हा परतावा व्याजासह १ करोड १० लाखाच्या घरात गेला होता. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत प्रत्यक्ष अवघे १ कोटी ६९ लाख रुपये जमा झाले.

- Advertisement -

९० लाख रुपयांचा परतावा रद्द

या सर्व प्रकारात गोलमाल असल्याचे भदाणे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अंतिम कर निर्धारण केलेल्या बड्या व्यापाऱ्यांची पुर्नसुनावणी लावली. या प्रक्रियेत त्यांना द्यावयाचा ९० लाख रुपयांचा परतावा रद्द करून गजानन मार्केट मधील दुबई दुपट्टा, शगुण या दोन खातेदारकांकडून ४७ लाख रुपये आणि कुमार टेक्सटाईल या व्यापाऱ्यांकडून १५ लाख रुपये वसूल केले. परमानंद अहुजा या व्यापाऱ्याच्या पी. जी. टेक्सटाईल कडून १ कोटी ३९ लाख रुपयांचे येणे बाकी आहे. अहुजा ही रक्कम पालिकेत भरायला तयार नसल्यामुळे भदाणे यांनी अहुजा यांची बँक खाती सिल केली आहेत. भदाणेच्या या कारवाईमुळे पालिकेच्या तिजोरीला तीन कोटी रुपयांचा फायदा झालेला आहे. ४० महिने काम केल्यानंतर पालिकेला नाममात्र १ कोटी ६९ लाख रुपयांचा फायदा झाला, तर अवघ्या चार महिन्यात पालिकेला तीन कोटी रुपयांचा फायदा करून देणाऱ्या भदाणेंना पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी यांना त्यांचा पदभार काढून घेतल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.


हेही वाचा – उल्हासनगर पालिकेत राडा; आयुक्तांविरोधात नगरसेवकांचा पालिकेतच ठिय्या!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -