घरमुंबईमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानवरील खानपान खर्च कोटींच्या घरात

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानवरील खानपान खर्च कोटींच्या घरात

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा आणि सागर या सरकारी निवासस्थानी भेटीसाठी येणाऱ्या लोकांच्या खानपान सेवांसाठी आता पुरवठादार निश्चित करण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी (६ एप्रिल) जाहीर केला आहे. वर्षा व सागर या सरकारी निवासस्थानी छत्रधारी कॅटरर्स आणि सुखसागर हॉस्पिटॅलिटीची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही निवासस्थानी खानपानासाठी अंदाजित खर्च अनुक्रमे ३.५० कोटी आणि १.५० कोटी इतका असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सरकारी निवासस्थानी मान्यवर अतिथींसाठी खानपान सेवा पुरविणाऱ्या पुरवठादाराची नियुक्ती गेल्या वर्षी जाहीर करण्यात आली होती. यानुसार अंदाजित ५ कोटी रुपयांची ई-निविदा करण्यात आली होती. त्यानुसार तीन निविदाकारांनी अर्ज केला होता. यापैकी छत्रधारी कॅटरर्स आणि सुखसागर हॉस्पिटॅलिटी यांची निविदा निश्चित करण्यात आल्याची माहीती सामान्य प्रशासन विभागाने सरकार निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केली आहे.

- Advertisement -

या दोन्ही निविदाकारांशी करार करण्यात आला असून विविध पदार्थांचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय अटी आणि शर्थी पुरवठादारास बंधनकारक असणार आहेत. अटी आणि शर्थींचे उल्लघंन झाल्यास या कंत्राटदारांवर कारवाई होईल, असे सरकार निर्णयात नमूद करण्यात आले आहे. हा करारनामा झाल्यावर नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क भरण्याची जबाबदारी कंत्राटदाराला देण्यात आली आहे. कंत्राटदाराने निश्चित केलेल्या दरांव्यतिरिक्त अन्य दराने अन्नपदार्थांचा पुरवठा केल्यास त्याबाबतचे देयक मंजूर होणार नाही, असेही सरकार निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केले आहे.

चहामध्ये सोन्याचे पाणी टाकायचे का?
काही दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. मागील चार महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील २ कोटी ३८ लाख रुपये इतके आले आहे. एवढे बील कसे काय आले? सरकार चहामध्ये सोन्याचे पाणी टाकायचे का? असा खोचक प्रश्न अजित पवार यांनी विचारला होता. यावेळी त्यांनी सांगितले की, मी पण मुख्यमंत्री होतो. माझेही सहकारी मित्र मुख्यमंत्री होते. पण एवढे बिल कधी आले नाही, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -