घरमुंबईसिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Subscribe

मध्य रेल्वेच्या दादर ते परळ या रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला होता. हा बिघाड दुरुस्त करण्यात आला असून वाहतूक व्यवस्था पूर्ववतपणे चालू झाली आहे.

रविवारी मेगा ब्लॉक आणि सोमवारी महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने मुंबईकर घरा बाहेर पडले होते. मात्र मध्य रेल्वेच्या बिघाडामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या या कारभाराव प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. मध्य रेल्वेच्या दादर आणि परळ स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांची लांबच लांब रांगा लागल्या. सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. हा बिघाड दुरुस्त झाला असून वाहतूक व्यवस्था पुर्ववत सुरु झाली आहे.

- Advertisement -

अनेक गाड्या रद्द

कालच परळ टर्मिनसचे उद्घाटन झाले होते. आजपासून परळ टर्मिनसवरून लोकल सेवा सुरू झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचे चागलेच हाल झाले आहेत. या बिघाडामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवांशांनी गाडी चालू होण्याची वाट न पाहता गाडीखाली उतरुन रेल्वे रुळावर चालणं पसंत केलं. त्यामुळे प्रचंड गर्दी रेल्वे रुळावर पाहायला मिळाली. या तांत्रिक बिघाडामुळे अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला तर काहींनी मनस्ताप व्यक्त केला. काही वेळानंतर झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि वाहतूक व्यवस्था पुर्वपदावर सुरु करण्यात आली. मात्र, यामुळे बऱ्याच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -