घरमुंबईबेस्टच्या तिजोरीत खुळखुळ

बेस्टच्या तिजोरीत खुळखुळ

Subscribe

चिल्लर नोटांच्या बदल्यात देणार

बेस्टने ऐतिहासिक भाडे कपात करून मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. बेस्टचा प्रवास आता 5 आणि 6 रुपयात होत आहे.त्यामुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे.मात्र परिणामी बेस्टकडे मोठ्या प्रमाणात 5 आणि 10 रुपयांची नाणी जमा होत आहेत. ही जमा झालेली चिल्लर नोटांच्या बदल्यात देण्यात छोटे मोठे व्यापारी, तसेच प्रवासी मुंबईकरांना देण्याची तयारी केली आहे.

बेस्ट बसच्या ताफ्यात 3,337 बसेस असून प्रवासी संख्या 32 लाखांपर्यत गेलेली आहे. तिकीट दर कपातीनंतर प्रवाशांनी बेस्ट बसला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. मात्र किमान तिकीट पाच रुपये केल्याने प्रवासी 10 व 20 रुपयांच्या नोटा वाहकाला देतात. वाहक पाच रुपयांची मागणी करत पैसे सुट्टे नसल्याचे प्रवाशांना सांगतात. यावरून प्रवासी व बेस्ट बस वाहक यांच्या वादावादीत होत आहे.

- Advertisement -

त्यामुळे बेस्ट उपक्रमाने वाहकांना रोज देणारी 100 रुपयांच्या सुट्ट्या नाण्यांऐवजी जास्त सुटे पैसे द्यावेत, अशी मागणी कर्मचार्‍यांकडून होत आहे. बेस्टने भाडे कपाती केल्यानंतर बेस्टकडे सध्या मुबलक प्रमाणात 5,10 रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. दररोज सुमारे 12 लाखांची चिल्लर बेस्टकडे जमा होते. इतकी चिल्लर मोजण्यासाठी बेस्टला कर्मचार्‍यांची ड्युटी लावाली लागते.त्यामुळे बेस्ट प्रशासन कर्मचार्‍यांना पगारातील काही रक्कम 10 रुपयांच्या नाण्यांच्या स्वरुपात देखील देतात.

सुट्टे पैसे वितरित करण्याची व्यवस्था

- Advertisement -

जमा होणारी चिल्लर आता नागरिकांना , व्यापारीवर्गाला आणि समाजातील इतर तत्सम घटकांना उच्च मूल्यवर्गाच्या नोटाच्या बदल्यात बेस्टतफ र्ेंउपलब्ध करुन देण्यात येत आहेत.याकरिता उपक्रमाच्या सर्व बस आगारांमध्ये तिकीट व रोख विभागात (रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून) सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 या वेळेत सुट्टी नाणी आणि नोटा वितरित करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -