घरमुंबईकामगारांच्या वेतनातील रक्कम हडप करण्याचा ठेकेदाराचा डाव

कामगारांच्या वेतनातील रक्कम हडप करण्याचा ठेकेदाराचा डाव

Subscribe

कामगारांची रक्कम ठेकेदाराच्या खात्यात जमा करण्यात आली असतानाही ठेकेदाराने आजपर्यंत कामगारांना ती रक्कम दिलेली नाही. ही रक्कमपरस्पर हडप करण्याचा डाव नेमस्त इलेक्ट्रिकल ठेकेदाराचा आणि कार्यकारी अभियंता विद्युत विभाग परिमंडळ -2 यांचा असल्याचा आरोप समाज समता कामगार संघटनेकडून करण्यात आला आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कामगारांना अदा करण्यासाठीची थकबाकीची रक्कम ठाणे-बेलापूर रोड वरील पदपथ दिवे मेंटेनन्स करणार्‍या नेमस्त इलेक्ट्रिकल या विद्युत विभागातील ठेकेदाराच्या खात्यात वळती करण्यात आली.

- Advertisement -

तरीही ती कामगारांना देण्यात आली नसल्याने कार्यकारी अभियंता गाडे आणि नेमस्त इलेक्ट्रिकल या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नेमस्त इलेक्ट्रिकल आणि कार्यकारी अभियंता गाडे यांच्यावर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल असे संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी सांगितले.

याबाबत ठेकेदाराकडे चौकशी केली असता ठेकेदाराने महानगर पालिकेकडून रक्कम मिळालेली नाही, असे सांगितले. परंतु विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता गाडे यांनी ठेकेदाराला पूर्ण रक्कम मिळाली असून ती ठेकेदाराने कामगाराला दिली पाहिजे जर ठेकेदाराने दिली नसेल तर ते देतील असे सांगितले. तसेच परिमंडळ एक विभागांतर्गत तुर्भे सानपाडा स्मशानभूमीत कार्यरत कामगारांना ओम दिगंबर हा ठेकेदार अशाच प्रकारे किमान वेतन थकबाकी देण्यास टाळाटाळ करत असल्याने याबाबत तुर्भे विभाग कार्यालयाचे स्वच्छता अधिकारी वडजे त्यांच्याकडे ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

तुर्भे विभाग स्वच्छता अधिकारी ओम दिगंबर या ठेकेदाराने तुर्भे सानपाडा स्मशानभूमीतील कामगारांना थकबाकीची रक्कम आजपर्यंत दिलेली नाही ठेकेदारास सदरची रक्कम दीड महिन्यापूर्वी मिळाली आहे.

ठाणे-बेलापूर रोडवरील पदपथ दिवे मेंटेनन्स करणार्‍या नेमस्त इलेक्ट्रिकल या विद्युत विभागातील ठेकेदाराच्या खात्यात कामगारांच्या वेतनाची रक्कम टाकण्यात आली आहे. ती रक्कम लवकरच कामगारांना देण्यात येईल.पीएफसह इतर सुविधांची इंत्यभूत माहिती नसल्याने सदरील रक्कम ठेकेदाराकडून देण्यास विलंब झाला असावा.
-प्रवीण गाडे, कार्यकारी अभियंता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -