घरमुंबईमेट्रो-सहासाठी पवई तलावाचे मगर उद्यान बाधित

मेट्रो-सहासाठी पवई तलावाचे मगर उद्यान बाधित

Subscribe

महापालिकेने पाहिलेले पवई तलावातील मगरींच्या संवर्धनासाठी बांधण्यात येणाऱ्या मगर उद्यानाचे स्वप्न भंग होत असल्याचे समोर येत आहे.

मुंबईतील जुन्या तलावांपैकी पवई तलाव हा एक निसर्गरम्य तलाव आहे. महापालिकेने या पवई तलावाचे मगर उद्यान करण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, याच तलाव परिसरातील मेट्रो-सहा बांधण्यासाठी हा तलाव बाधित ठरला आहे. तलाव बाधित असल्याच्या प्रस्तावामुळे मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर मगर तलावाचा विचार करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या कामाच्या निविदांना ही स्थगिती देण्यात आली आहे. पवई तलावात सांडपाणी सोडल्या मुळे त्यातील पाण्याची गुणवत्ता खालवली आहे. त्यामुळे तलावातील पाणी शुद्ध होण्यासाठी तलावात येणारे सांडपाणी वळवण्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या. मात्र, जोगेश्वरी ते विक्रोळी लिंक रोड मार्गाने जाणऱ्या मेट्रो-सहाचे काम करण्यात येणार असल्याने मगर उद्यानाचे काम तात्पूरते बाजूला ठेवण्यात आले आहे, अशी पालिकेच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

तलावातील सांडपण्यामुळे जलचरांना धोका

दरम्यान, मगर उद्यानाची मागणी करणारे पालिकेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी पालिकेकडे मागणी केली होती की, मगर उद्यान बांधण्याच्या अगोदर तलावात तिथल्या निवासांकडून तिथे वाहने धुतली जातात. तसेच तिथल्या औद्योगिक कंपन्यांमधील सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे तलावातील मगर, मासे अशा जलचरांची जीविताला हानी पोहचून तलावातील मगरींची संख्या कमी होत आहे. त्यामुळे मगर उद्यानाचा विचार करण्यापूर्वी तलावात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याची समस्याकडे प्रथम लक्ष द्यावे. तसेच तलावातील पाणी स्वच्छ झाल्यानंतर मगर उद्यान आणि तलावात जलक्रीडा सुरू करण्याबाबत पालिका अधिकाऱ्यांकडून चाचपणी करण्यात येत आहेत.

- Advertisement -

तलावाला पर्यटकांची गर्दी

पवई तलावाच परिसर हा २०० हेक्टर जागेमध्ये विस्तारलेला आहे. निसर्गरम्य असलेला हा तलावावर पर्यटकांतची मोठी गर्दी असते. या तलावतील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात नाही. तर त्या पाण्याचा औद्योगिक कंपन्यांसाठी केला जात आहे. पवई तलावातील मगरींचे संवर्धन करण्यासाठी तिथे मगर उद्यान बांधण्याचे पालिकेने निश्चित केले होते. मागिल काही वर्षांमध्ये पालिकेकडून शंभर कोटीहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -