घरमुंबईNisarg Cyclone: दापोलीतील इळणे गावाला चक्रीवादळाचा फटका; तरुणांमुळे वाचले गावकऱ्यांचे प्राण

Nisarg Cyclone: दापोलीतील इळणे गावाला चक्रीवादळाचा फटका; तरुणांमुळे वाचले गावकऱ्यांचे प्राण

Subscribe

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने झोडपून काढले. कोकण भागात वादळामुळे मोठे नुकसान झाले असून अनेकांची घरे या वादळात उद्ध्वस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनी या वादळग्रस्त परिसराचा पाहणी दौरा केला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या इळणे गावातही चक्रीवादळाने धुमाकूळ घातला असून येथील तरुणांनी गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी घेऊन गेल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र या गावकऱ्यांनी सांगितलेला चक्रीवादळाचा अनुभव थरारक असून त्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

इळणे गावाला चक्रीवादळाचा जबर तडाखा बसला असून, येथील काही घरे सोडली तर बाकी सर्व घरे उद्ध्वस्त झाली आहेत. येथील ग्रामस्थांनी शाळेत निवारा घेतला असून प्रशासनाकडून आंजर्ले तसेच लगतच्या परिसरातील गावांत अजूनही अपेक्षित मदत मिळालेली नाही.

- Advertisement -

देवा आम्हाला वाचवं; वादळावेळी केली गावकऱ्यांनी याचना!

निसर्ग चक्रीवादळानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील इळणे गावांतील लोकांनी भावना

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಜೂನ್ 11, 2020

अनेक गावांना वादळाचा फटका 

दापोली तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे असलेली गावे या वादळात उद्ध्वस्त झाली आहेत. आंजर्ले गावातील अनेक घरे कोसळली असून वाड्यांमध्ये शिरण्याचे रस्ते झाडांची पडझड झाल्यामुळे बंद झाले आहेत. तालुक्यातील आंजर्ले, आडे, पाडले, उटंबर, केळशी, इळणे, रोवले, माळवी, आडेकोंड, लोणवडी, बोरथळ, सुकोंडी, देहेणा, वाघिवणे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नारळी, पोफळी, आंबे, केळी, काजूच्या बागा होत्या. वादळात त्या भुईसपाट झाल्या आहेत. वादळामुळे आंजर्लेचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. गावात फारच बिकट परिस्थिती आहे.

- Advertisement -

घरातील उपलब्ध अन्न पावसाने भिजल्यामुळे किंवा घरच कोसळल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल होत असून, काहींना खारे पाणी प्यावे लागत आहे. आंजर्लेसारखीच परिस्थिती आडे-पाडले, इळणे आणि केळसी या गावांचीदेखील झाली आहे. येथेही घरांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा –

देशभरात २४ तासांत १० हजार ९५६ नवे रुग्ण; ३९६ कोरोनाबाधितांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -