घरमुंबईअटल बिहारी वाजपेयी डोंबिवलीकरांच्या स्मरणातच ....

अटल बिहारी वाजपेयी डोंबिवलीकरांच्या स्मरणातच ….

Subscribe

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजेपयी हे स्वामी विवेकानंद यांचे निस्सीम भक्त होते. जनसंघाच्या काळात डोंबिवली नगरपालिकेच्यावतीने ५०-५२ वर्षापूर्वी डोंबिवलीतील भागशाळा मैदान येथे वाजपेयींचा भव्य सत्कार करण्यात आला होता.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजेपयी हे स्वामी विवेकानंद यांचे निस्सीम भक्त होते. जनसंघाच्या काळात डोंबिवली नगरपालिकेच्यावतीने ५०-५२ वर्षापूर्वी डोंबिवलीतील भागशाळा मैदान येथे वाजपेयींचा भव्य सत्कार करण्यात आला होता. ३८ वर्षांपूर्वी वाजपेयी यांच्या हस्ते डोंबिवली नगरपालिकेच्या इमारतीचे आणि स्वामी विवेकानंद यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण पार पडले होते. त्यावेळी ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते होते. राजकारण बोलणार नाही, केवळ स्वामी विवेकानंदाचा शिष्य म्हणून येणार असे त्यांनी सांगितले आणि तासभर स्वामी विवेकानंदावर भाषण केले. त्यांचे विचार आजही कानात आहेत. तीन ते चार वेळा वाजपेयी डोंबिवली आले होते. मराठी माणसे आणि महाराष्ट्राविषयी त्यांच्या मनात आत्मियता होती अशी आठवण डोंबिवली नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितली.

डोंबिवली हा जनसंघाचा आणि त्यानंतर भाजपचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. डोंबिवली नगरपालिकेवर जनसंघाची सत्ता होती. १९८० साली आबासाहेब पटवारी हे नगराध्यक्ष झाले. त्यावेळी डोंबिवली नगरपालिकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आणि स्वामी विवेकानंद यांच्या अर्धपुतळण्याचे अनावरण लोकसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक अ‍ॅडव्होकेट कै शशिकांत ठेासर यांनी अनुमोदन दिले. आम्ही वाजपेयींना निमंत्रण देण्यासाठी दिल्लीला गेलो त्यावेळी वाजपेयींनी, तुमच्या नगरपालिकेचं बजेट किती आहे. पुतळा किती मोठा बसवणार आहात असे अनेक प्रश्न विचारले. नेतेमंडळी कार्यकत्यांची किती कदर करीत असते. तुम्ही पुतळयावर भरमसाठ खर्च तर करणार नाहीत ना, हेच त्यांच्या बोलण्यातून सांगितलं जात हेात. मात्र हा अर्धपुतळा असून, काही हजार खर्च करणार आहोत असे सांगितल्यानंतर ते कार्यक्रमाला येण्यास तयार झाले अशी आठवण आबासाहेब पटवारी यांनी सांगितली.

- Advertisement -

जनसंघाच्या काळात डोंबिवलीत ते अनेकवेळा आले. विविध बँकाच्या कार्यक्रमासाठी ते कल्याण व डोंबिवली आले होते. मराठी मंडळींच ते नेहमी कौतूक करते. तुम्ही छोटी छोटी रक्कम जमा करता आणि त्यातून बँका निर्माण करता.आमच्या उत्तरप्रदेशमध्ये पैसे जमा करतात, नंतर ते कुठे जातात आम्हाला कळत नाही अशीही वाजपेयी बोलल्याची आठवणही आबासाहेबांनी सांगितली. वाजपेयींना महाराष्ट्राबद्दल अत्यंत अभिमान होता. एक दोन वाक्य तरी मराठीत बोलल्याशिवाय ते भाषण करीत नसत. त्यांनी ज्ञानेश्वरी वाचलेली होती ते अनेकवेळा ज्ञानेश्वरी मधील उदारहणे देत होते. लोकमान्यांवर प्रचंड आदर होता. सर्वसामान्यांचा नेता होता. सामान्यांबद्दल विलक्षण प्रेम होत. केव्हाही त्यांना भेटू शकत होते असेही आबासाहेबांनी सांगितले.

डोंबिवलीतील एका शाळेचे मुख्याध्यापक मुलांना घेऊन दिल्लीला गेले होते, त्यावेळी मुलांनी अटलजींना भेटण्याचा आग्रह केला होता. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले. पंतप्रधानांची अशी भेट होत नाही, त्यासाठी अगोदर परवानगी काढावी लागते असे त्यांना सांगण्यात आले. त्यावेळी मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितले की डोंबिवलीची मुले भेटण्यासाठी आले आहेत, इतका निरोप तुम्ही त्यांना द्या. त्यावेळी त्या सुरक्षा रक्षकांनी निरोप देताच. त्यांनी आश्चर्याने बोलावले, ४०- ५० मुलांबद्दल खूप गप्पा मारल्या. मुलांबद्दल त्यांना खूप प्रेम होतं अशी आठवणही पटवारी यांनी सांगितली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -