घरमुंबईडोंबिवलीतील पेंढारकर महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची लूट

डोंबिवलीतील पेंढारकर महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची लूट

Subscribe

विद्यार्थ्यांची लूट थांबवली नाही तर विद्यार्थी भारती लवकरच तीव्र आंदोलन करेल असा इशारा राज्याध्यक्ष मंजिरी धुरी यांनी दिला आहे..

डोंबिवलीच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पेंढारकर कॉलेजच्या संदर्भात तेथील विद्यार्थ्यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून असंख्य तक्रारी विद्यार्थी भारती संघटनेकडे आल्याचे संघटनेच्या राज्य कार्यवाह श्रेया निकाळजे यांनी सांगितले. तक्रारींचा पाठपुरावा केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या असून मनमानी कारभार लवकरात लवकर थांबला नाही आणि विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी परत केली नाही तर विद्यार्थी भारती लवकरच तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राज्याध्यक्ष मंजिरी धुरी यांनी दिला आहे.

नेमक्या काय आहेत तक्रारी

नवीन वर्षात प्रवेश घेताना विद्यार्थांकडून मोबाइल अॅपच्या नावाने १५० फी घेतली जाते, मात्र या प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. ATKT च्या फॉर्ममध्ये मार्कशीटसाठी प्रत्येक फॉर्म मागे५० रुपये जास्त घेतले जातात. बोनाफाइडसाठी २० रूपयांनऐवजी ५० रुपये घेतले जात आहे. जेव्हा की नियमांप्रमाणे २० रुपये घेतले पाहिजे. या तक्रारी विद्यार्थांकडून करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

 

आणखी काय समस्या आहेत

महाविद्यालयाच्या आवारात असताना हातात मोबाईल असल्यास तो जप्त करून दंड घेतला जातो. जिमखाना असूनही त्यात साहित्य उपलब्ध नाही. ग्रंथालयात येणारी मासिके बंद केलेली आहेत. तसेच मराठी वर्तमानपत्रांमध्ये कपात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ग्रंथालयात हवे ते पुस्तक पाहण्यासाठी आतमध्ये प्रवेश बंद केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड असतानाही महाविद्यालय मनमानी कारभार करत आहे. HSC हॉलतिकीटां मधील दुरुस्तीसाठी १०० ते २५० रुपये फी आकारली जात आहे. ते न भरल्यास विद्यार्थ्यांचे निकाल अडवले जातात. महाविद्यालयाचा हा भोंगळ कारभार चालू आहे . महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील मानसिक त्रास दिला जात असल्याचे विद्यार्थी भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान महाविद्यालयाचा हा मनमानी कारभार जर लवकरात लवकर थांबला नाहीआणि विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी परत केली नाही. तर विद्यार्थी भारती लवकरच तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राज्याध्यक्ष मंजिरी धुरी यांनी दिला आहे..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -