घरमुंबईबिहारमधील मधूबनी चित्रकलेच्या संवर्धनासाठी साकारली पर्यावरणस्नेही सजावट

बिहारमधील मधूबनी चित्रकलेच्या संवर्धनासाठी साकारली पर्यावरणस्नेही सजावट

Subscribe

डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ७०वे वर्षं असून त्यांनी देखाव्यातून बिहार राज्यातील मधूबनी चित्रकलेची सजावट साकारली आहे.

डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ७०वे वर्षं असून त्यांनी देखाव्यातून बिहार राज्यातील मधूबनी चित्रकलेची सजावट साकारली आहे. ज्येष्ठ कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी ही कलाकृती साकारली आहे. बिहार राज्यातील मिथीला जिल्ह्यातील मधुबनी परिसरातून मधुबनी चित्रकला उदयास आली आहे. मधुबनी कलेची वैशिष्ट्ये म्हणजे ही चित्रे विविध प्रकारच्या कलासामुग्रीचा वापर करून काढण्यात येतात. यामध्ये हाताची बोटे, कुंचले, शाईची पेन, काड्यापेटीच्या काड्या यांचा वापर चित्रे काढण्यास तर झाडाच्या पाल्यापासून बनविलेले नैसर्गिक रंग आणि रंगद्रव्यांचा वापर रंगवण्यासाठी केला जातो. या चित्रांमधील नाविन्यपूर्ण द्विमितीय भौमितीक आकार हे देखील या कलेचे वेगळेपण दाखवतात, असेही धबडे यांनी सांगितले. तसेच हा संपुर्ण देखावा केवळ लाकूड, कापड आणि कगद यासारख्या पर्यावरणस्नेही वस्तू वापरूनच करण्यात आला आहे.

- Advertisement -

३६ तासांत रेखाटली चित्रे

ही सजावट साकारण्यामध्ये अभिषेक बोडखे, सोनल वाघ, आदित्य मोरे, अनिकेत विरकर, गौरी रोकडे, मिलिंद पाटील, तेजस शिरसूल या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या ७ कलाकारांनी आणि व्यवस्थापक सुनील महाले यांनी मोलाचे सहाय्य केले. त्यांनी केवळ ३६ तासांत ही चित्रे रेखाटली आहेत. काही वर्षात कालपरत्वे लोप पावत चाललेल्या विविध कलांचे दर्शन घडविण्याचा मानस असल्याचे धबडे यांनी सांगितले. गेली २० वर्षे गणेशोत्सवातील सजावट धबडे साकारत आहेत. दरवर्षी विविध संस्कृतींचे आणि कलांचे दर्शन घडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आतापर्यंत थायलंड प्रतिकृती, नागालॅंड संस्कृतीची प्रतिकृती, बगीचातील गणपती, कम्बोडियातील ॲंगकोर वटची प्रतिकृती, पाण्याखालील मंदिराचा देखावा, जयपुर महाल, तिबेटीयन संस्कृती, चीन येथील मंदिर संस्कृती हे देखावे साकारले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पाकिस्तानचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही – अजित डोवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -