घरमुंबईगणोशोत्सव सजावटीचे इको फ्रेंडली पर्याय!

गणोशोत्सव सजावटीचे इको फ्रेंडली पर्याय!

Subscribe

गणेशोत्सवाच्या काळात सजावटीसाठी थर्माकोलचा सर्वात जास्त वापर केला जात असे, मात्र यावर बंदी असल्यामुळे मुंबईतील गणेशभक्तांनी इको फ्रेंडली सजावटीचा पर्याय निवडला आहे. चला मग पाहूया सजावटीसाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईची बाजारपेठ सजू लागली आहे. मुंबईतील लालबाग, परळ, दादर, बोरिवली या सारख्या अनेक ठिकाणी खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. राज्य सरकारकडून प्लास्टिक बंदीनंतर थर्माकोल बंदी लागू करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात सजावटीसाठी थर्माकोलचा सर्वात जास्त वापर केला जात असे, मात्र यावर बंदी असल्यामुळे मुंबईतील गणेशभक्तांनी इको फ्रेंडली सजावटीचा पर्याय निवडला आहे. चला मग पाहूया सजावटीसाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत.

झाडांची सजावट
भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात विभिन्न प्रकारची झाडे पाहायला मिळतात. त्यांचा सजावटीसाठी वापर केला जाऊ शकतो. यात फेंगशुईचे झाड, गुलाबाचे झाड, जास्वंदीचे झाड अशा अनेक झाडांचा समावेश आहे.

- Advertisement -

फुलांच्या सजावटीला मागणी
पावसाळ्यात फुलांचे उत्पादन कमी असते, मात्र उत्सवाच्या काळात त्यांची मागणी सर्वात जास्त असते. यंदा बहुसंख्य मुंबईकरांनी आणि सार्वजनिक मंडळांनी फुलांच्या सजावटीला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. यामध्ये गुलाब, मोगरा, चाफा अशा फुलांचा समावेश आहे. यात ओर्चीड या फुलाची सर्वाधिक मागणी आहे.

कापडच्या पडद्यांना पसंती
मुंबईत असणार्‍या मंगलदास मार्केट, लालबाग मार्केट येथे कापडचे पडदे मिळतात. त्यांचा सजावटीसाठी वापर करण्यात येतो. ते खरेदी करण्यासाठी लोकांनी येथे गर्दी केली आहे.

- Advertisement -

इको रियूझेबल मखर
गेल्या वर्षीपर्यंत थर्माकोलच्या मखरांना मोठी मागणी होती. मात्र थर्माकोल बंदीनंतर आता इकोफ्रेंडली मखरांना लोकांनी प्राधान्य दिले आहे. हे मखर एका विशिष्ट प्रकारच्या कागदापासून बनवले जातात. मखर बांधून ठेवले जातात आणि पुढच्या वर्षी पुन्हा वापरता येऊ शकतात.

नारळाची करवंटी आणि प्लास्टिक बॉटलची सजावट
नारळ फोडल्यावर त्याच्या करवंट्या फेकून देण्यात येतात. त्या फेकून न देता जमा करून त्यांचा सजावटीसाठी वापर करण्यात येतो. त्याला रंग दिला जातो. त्याचप्रमाणे प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांचादेखील सजावटीसाठी वापर केला जातो.

पूर्वी थर्माकोलचा वापर सजावटीसाठी मोठ्याप्रमाणावर केला जायचा. मात्र थर्माकोलवर आता बंदी असल्यामुळे लोकांनी सजावटीसाठी इकोफ्रेंडली मखरांंना पसंती दिली आहे. त्यामुळे त्यांची मागणी वाढली आहे.
– स्वप्निल कसाबे, मखर विक्रेता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -