घरमुंबईअतिवृष्टीमुळे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

अतिवृष्टीमुळे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

Subscribe

राज्यातील मुसळधार पावसामुळे कोकणसह कोल्हापूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दळणवळण व्यवस्था ठप्प आहे. परिणामी निवड झालेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यात मेडिकल, इंजिनियरिंग व बी.टेकच्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे मेडिलकच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) एक दिवसांची तर इंजिनिअरिंग व बी.टेकच्या प्रवेशासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) विद्यार्थ्यांना दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. सीईटी व तंत्र शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सीईटी सेलकडून मेडिकल अभ्यासक्रमाची तर डीटीईकडून इंजिनिअरिंग व बी.टेक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. राज्यामध्ये होत असलेल्या मुसळधारांमुळे एमबीबीएस व बीडीएसला तब्बल 1696 विद्यार्थ्यांना निवड झालेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेता येत नाहीत. तर इंजिनिअरिंग व बी.टेकच्या तिसर्‍या कॅप राऊंडमध्ये निवड झालेल्या सातारा, सांगली, कोल्हापूर व कोकणातील विद्यार्थ्यांना एआरसीवर जाऊन प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. यापार्श्वभूमीवर मेडिकलच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 8 ऑगस्टपर्यंत तर इंजिनिअरिंग व बी.टेकच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 9 व 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

- Advertisement -

सीईटी सेलने मेडिकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना एक दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मात्र पूरस्थिती पाहता विद्यार्थ्यांना आणखी मुदतवाढ मिळावी यासाठी न्यायालयाला विनंती करण्यासंदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले.

मदत केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव
मेडिकलच्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्याऐवजी स्थानिक पातळीवर घेण्यासाठी मदत केंद्र उभारण्यात यावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल व त्यांना सहज प्रवेश घेता यावेत, यासाठी सीईटी सेलने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे मदत केंद सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -