घरपालघरतरूण कारमध्ये झोपला...आणि घडले भलतेच

तरूण कारमध्ये झोपला…आणि घडले भलतेच

Subscribe

वसईत राहणारा अभिजित राणे (३३) हा रविवारी रात्री मुंबई- अहमदाबाद महामार्गावरून घरी येत होता. बापाणे येथील लोटस ढाब्याजवळ त्याचा मित्र भेटणार होता.

विरार:  मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील बापाणे येथे चोरांनी गाडीचा दरवाजा उघडून एका तरुणाच्या खिशातील दीड लाखांचा फोन लंपास केला आहे. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसईतील एका तरुणाला गाडीत बसून डुलकी लागल्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. रस्त्यावरून चालणार्‍यांचे फोन लंपास करणे हा प्रकार तर नियमित होतो. पण रिक्षात बसलेल्या प्रवाशांचे अगदी दुचाकीवरून जाणार्‍या प्रवाशांचेही फोन लंपास केले जातात. परंतु गाडीत डुलकी घेत असेलल्या एका तरुणाचाही महागडा आयफोन चोरांनी लंपास केला आहे.

वसईत राहणारा अभिजित राणे (३३) हा रविवारी रात्री मुंबई- अहमदाबाद महामार्गावरून घरी येत होता. बापाणे येथील लोटस ढाब्याजवळ त्याचा मित्र भेटणार होता. त्याची वाट पाहत अभिजित गाडीत बसला होता. मात्र त्याला डुलकी लागली. यावेळी अज्ञात चोरांनी त्याच्या गाडीचे दार उघडून अलगद त्याच्या खिशातील महागडा ‘आयफोन प्रो १४’ हा फोन लंपास केला. राणे याने सप्टेंबर महिन्यातच हा दीड लाख रुपये किंमतीचा फोन घेतला होता. या प्रकरणी त्याने नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सुरूवातीला पोलिसांना अशा प्रकारे चोरी झाल्याचा विश्वास बसत नव्हता. मात्र खात्री पटल्यानंतर पोलिसांनी कलम ३७९ अनव्ये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -