विमान हवेत असतानाच वैमानिकांना लागली डुलकी, पुढे काय घडले वाचा

डानमधील खार्तूमहून इथिओपियाची राजधानी अदीस अबाबाकडे उड्डाण केलेल्या विमानाचे वैमानिकांना झोप लागल्याची घटना समोर आली आहे.  जेव्हा ही फ्लाइट ET343 विमानतळाजवळ आली तेव्हा ट्रॅफिक कंट्रोल रुमने अलर्ट पाठवला. मात्र,  प्रयत्न करूनही वैमानिकांशी संपर्क झाला नाही. दरम्यान ऑटो पायलट डिसेबल झाले आमि अलार्म वाजला. यामुळे वैमानिक झोपेतून जागे झाले.त्यांनी विमानाचे नियंत्रण स्वताकडे घेतले आणि विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले.

यामुळे वैमानीकांना आली जाग –

एव्हिएशन हेराल्डनुसार वैनानिक झोपेत असल्याने ऑटो पायलटच्या मदतीने विमान आकाशात उडत होते. जेव्हा विमानाने रनवे क्रॉस केल्यावर ऑटो पायलट डिसेबल झाले.त्याचबरोबर विमानात मोठ्याने अलार्म वाजला.  यामुळे दोन्ही वैमानिक झोपेतून जागे झाले. त्यांनी विमानाचे नियंत्रण आपल्या हातात घेतले.  त्यानंतर जवळपास २५ मिनिटांनंतर विमान पुन्हा रनवे कडे पोहोचले. यानंतर येथे विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले.

वैमानिकांना कामाचा ताण –

एव्हिएशन सर्विलान्स सिस्टममधून मिळालेल्या माहिती नूसार यामध्ये स्पष्ट झाले आहे की, विमान रनवे वरून गेला. याचा एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये विमान आदिस अबाबा एयरपोर्टच्या वरून घिरट्या घालताना दिसत आहे. विमान उड्डाण विश्लेषक एलेक्स मॅचरास यांनीही घटनेविषयी ट्विटर वर पोस्ट केली आहे. त्याही ही घटना खूपच चिंताजनक असल्याचे म्हटले आहे व याला वैमानिकांवर असणारा कामाचा ताण कारणूभूत असल्याचे म्हटले आहे. अशाच प्रकारची घटना मे महिन्यात घडली होती. न्यूयॉर्कहून रोमकडे जाणाऱ्या विमानातील दोन वैमानिक जमिनीपासून ३८ हजार फूट उंचीवर विमान असताना झोपले होते.