घरमनोरंजनजान्हवी कपूरचे तिरुमला कनेक्शन काय, तिनेच केला खुलासा

जान्हवी कपूरचे तिरुमला कनेक्शन काय, तिनेच केला खुलासा

Subscribe

बॉलिवूडमध्ये अभिनयाबरोबरच आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायम चर्चेत ज्युनिअर एनटीआर व सैफ अली खान यांच्यासह जान्हवी लवकरच ‘देवारा’ या दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे.सुरुवातीला तिचा हा चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकळण्यात आली असून हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

आता तिचं चर्चेत असण्याचं कारण तिरुमला मंदिर आहे. अनेकदा जान्हवी ही तिरुमला मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याचे पाहायला मिळते. त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, आता तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ती गुडघे टेकवत संपूर्ण पायऱ्या चढत मंदिरात जाताना दिसते. पण कोणतीही गोष्ट असली की जान्हवी ही तिरुमला मंदिरात का जाते? त्या मागचं खरं कारण काय आहे हे जाणून घेऊया.

- Advertisement -

जान्हवी कपूरनं तिच्या आणि तिरुमला कनेक्शनविषयी एका मुलाखतीत सांगितलं की हे सगळं तेव्हा सुरु झालं जेव्हा ती छोटी होती आणि श्रीदेवी तिला तिरुमाला मंदिरात घेऊन जायची. तिनं सांगितलं की “मला तिथे जायला खूप आवडतं कारण तिरुमालाशी माझं एक विशेष आध्यात्मिक संबंध आहे. मी आधीच 50 वेळा जाऊन आले आहे आणि आता जेव्हापण मी तिथे जाते तेव्हा माझ्यासोबत काही चांगलं होतं.”

जान्हवी कपूर यावर्षी तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणजेच 6 मार्च रोजी तिरुमाला मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेली होती. तर या वर्षी जान्हवीनं तिचा 27 वा वाढदिवस तिथे साजरा केला. त्यानिमित्तानं तिच्यासोबत कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आणि मित्र ऑरीनं देखील हजेरी लावली होती. ऑरीनं त्याचा एक व्लॉग देखील केला आहे. या व्लॉगमध्ये त्या तिघांनी संध्याकाळच्या वेळी 3000 पायऱ्या चढण्यास सुरुवात केली आणि ते मध्य रात्री वरती पोहोचले. दरम्यान, परंपरेनुसार, भक्तांकडून ही अपेक्षा केली जाते की शेवटच्या 500 पायऱ्या ते गुढग्यांवर उभे राहत चढतील. जान्हवी या परंपरेनुसार करताना दिसते.

- Advertisement -

दरम्यान, जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, जान्हवी येत्या काळात ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’, ‘मिस्टर आणि मिसेस माही’, ‘देवरा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -