घरमुंबईजखमी गोविंदांसाठी सरकारी आणि खासगी हॉस्पिटल सज्ज

जखमी गोविंदांसाठी सरकारी आणि खासगी हॉस्पिटल सज्ज

Subscribe

गंभीररित्या जखमी होणाऱ्या गोविंदांवर तात्काळ औषधोपचारासाठी शहरासह उपनगरांतील पालिका, सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्स सज्ज झाली आहेत.

मुंबईत मोठ्या जल्लोषात दहीहंडीचा सण साजरा केला जाणार असला तरी, त्यात गंभीररित्या जखमी होणाऱ्या गोविंदांवर तात्काळ औषधोपचारासाठी शहरासह उपनगरांतील पालिका, सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्स सज्ज झाली आहेत. दरवर्षी थरावर चढताना सरासरी ४० गोविंदा जखमी होत असल्याची नोंद केली जाते. शिवाय अनेकांना कायमचं अंथरुणाला खिळावं लागतं. अशा परिस्थितीत गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी पालिका आणि खासगी हॉस्पिटलकडून पूर्वतयारीच्या दृष्टीकोनातून आपल्या रुग्णवाहिका तयार ठेवल्या आहेत. याशिवाय प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपात्कालीन विभागात अतिरिक्त खाटांची सोय करण्यात आली आहे.

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करताना गोविंदा पथकातील तरुणांमध्ये अपघात होण्याच्या प्रमाणात दरवर्षी वाढ होत असून अनेक तरुण कायमचे अंथरुणाला खिळतात. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या नायर हॉस्पिटलकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व विभागाच्या प्रमुखांसह सर्व नर्सेस, स्टाफ यांना आपात्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हॉस्पिटलमध्ये केलेली सुविधा

हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक जखमी गोविंदावर ओपीडी किंवा आंतररुग्णालयात तात्काळ उपचार केले जाणार.
प्रकृती गंभीर असलेल्या गोविंदाला आपात्कालीन वॉर्डमध्ये किंवा ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल केले जाईल.
प्रकृती स्थिर असलेले गोविंदा डिझास्टर वॉर्डमध्ये दाखल केले जाणार आहेत.
ट्रॉमा वॉर्डमध्ये गोविंदासाठी राखीव बेडची सुविधा केली आहे.
औषधांचा पुरेपूर साठा.
जखमी गोविंदावर मोफत उपचार.
गोविंदाला कोणतेही प्रिस्किप्शनशिवाय औषध दिले जाणार नाहीत.

शिवाय, प्रत्येक हॉस्पिटलच्या अधिष्ठातांना याविषयी प्रत्येकाला सूचना देण्याचं काम देण्यात आलं असल्याचं नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी स्पष्ट केलं आहे. तर, नवी मुंबईच्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरतर्फे गोविंदा पथकांना प्रथमोचार मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात येणार आहे.

- Advertisement -

सुविधेसाठी या क्रमांकावर संपर्क साधा

या सेवेअंतर्गत गोविंदा पथकातील जखमी गोविदांना प्रथमोचार आणि पुढील उपचार करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. या रुग्णवाहिकेत डॉक्टर, परिचारीका आणि वैद्यकीय मदतनीस यांचा समावेश असून या सेवेचा लाभ घेण्यासाठी सकाळी आठ ते संध्याकाळी आठ या वेळेत ९२२२६६६००० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


हेही वाचा – उद्या शाळांना दहिहंडीची सुट्टीच! शिक्षण विभागानं केलं स्पष्ट!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -